
आरोग्य सेवेत परिचारिका नेहमी तत्परतेने कार्यरत राहतात- मंघाराणी अंबुलगेकर
नांदेड : जगभरात ता. १२ मे रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन (inernational nurses day) म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त बुधवारी (ता. १२) जिल्हा परिषदेत फ्लोरेन्स (Jilha parishad nanded) नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवान करण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व परिचारिकांना जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे( ceo varsha thakur) व जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (The nurses in the health service are always working promptly - Mangharani Ambulagekar)
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नेरली येथील आरोग्य उपकेंद्रातील रोहिणी कटारे व पावडेवाडी उपक्रेंद्रातील शिवनंदा झूंजूरवार यांचा बुके व शुभेच्छा पत्रक देवून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, डॉ. शिवशक्ती पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. एम. मिरकुटे आदींची उपस्थिती होती. यानिमित्त आज जिल्ह्यातील सर्व परिचारिकेशी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ऑनलाईन संवाद साधला.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात 89 केंद्राद्वारे 11 मेअखेर तीन लाख 72 हजार 502 नागरिकांचे लसीकरण- डाॅ. विपीन
संवाद साधतांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर म्हणाल्या, रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखेखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असातात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांचे सुश्रुषा करण्याचे महत्वाचे कार्य परिचारिका करत असतात. आजच्या घडीलाही कोरोनासारख्या महाभयंकर संकट काळात परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे. कुटुंब, मुलं व प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस- रात्र झटून अत्यंत चोखपणे त्या सेवा बजावत आहेत. वैद्यकिय क्षेत्रात परिचारिका म्हणून त्यांचे योगदान अमूल्य असून या लढवय्या परिचारिकांचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी परिचारिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, गेल्या वर्षभरापासून कोवीडचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागातील महिला कर्मचा-यांचे मोठे योगदान लाभत आहे. परिचारिका व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेवून कोवीडसह इतर सांसर्गिक रोगांचा प्रसार रोखण्यासाठी गृहभेटी करुन सर्वेक्षण केले. दुर्गम भागातही त्यांनी आरोग्यसुविधा पोचविल्या आहेत. आरोग्य सेवेत त्या नेहमी तत्परतेने काम करत आहेत. अशा परिचारिकांचा आज सन्मानाचा दिवस आहे. त्यांच्या हातून भविष्य काळातही असीच सेवा निरंतर घडत राहो, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Web Title: The Nurses In The Health Service Are Always Working Promptly Mangharani
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..