नांदेड : परभणीतून फरार झालेल्या कैद्याला भोकर पोलिसांकडून अटक

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 2 September 2020

तिन्ही कैदी फरार झालेल्यापैकी एकाला भोकर पोलिसांनी बुधवारी (ता. दोन) पहाटे दोनच्या सुमारास भोसी (ता. भोकर) शिवारातून अटक केली. पथकप्रमुख फौजदार शालिनी गजभारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्र जागुन काढली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

नांदेड : परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल तीन कोरोंनाबाधीत कैदी रूग्ण मंगळवारी (ता. एक) पहाटे तीनच्या सुमारास फरार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान तिन्ही कैदी फरार झालेल्यापैकी एकाला भोकर पोलिसांनी बुधवारी (ता. दोन) पहाटे दोनच्या सुमारास भोसी (ता. भोकर) शिवारातून अटक केली. पथकप्रमुख फौजदार शालिनी गजभारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्र जागुन काढली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.  

परभणी जिल्हा कारागृहातील ८४ कैद्यांना कोरोना विषाणुचा संसर्ग झाला आहे. या पैकी १६ कैदी सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी (ता. एक) पहाटे तीन कैदी फरार झाल्याची घटना उघडकीस आली होती. मंगळवारी (ता. एक) पहाटेच्या सुमारास खिडकीचे गज तोडून गादीवरील चादरीच्या साह्याने रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावरील कक्षाबाहेर उड्या मारून ते फरार झाले होते. दरम्यान हे तिन्ही आरोपी गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्याची माहिती परभणी पोलिसांनी दिली. 

हेही वाचा हिंगोली : परभणी येथील कोवीड सेंटरमधून पळालेला आरोपी बासंबा पोलिसांनी पकडला

फरार कैदी नांदेड, हिंगोली व परभणीचे अट्टल गुन्हेगार

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास फरार तिघे कोरोंनाबाधीत आरोपी हे हिंगोली, नांदेड व परभणीचे अट्टल गुन्हेगार आहेत. यातील दोघे खुनाच्या गुह्यातील शिक्षा भोगत असून अन्य एक जण हा गांज्याच्या तस्करीतला असल्याची माहिती आहे. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती नानलपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली.

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यात पुन्हा धान्य घोटाळा- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई -

फौजदार शालिनी गजभारे यांची धाडशी कारवाई

भोकर पोलिसांना फरार झालेला आरोपी सरदार अमरजीतसिंग सरदार सेवकसिंग हा आपल्या हद्दीत आल्याचे समजले. यावेळी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार आणि पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शालिनी गजभारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भोसी परिसरात सापळा लावला. रात्रभर अमरजीतसिंग हा पोलिसांना चकमा देत होता. शेवटी त्याला पकडण्यात यश आले. फौजदार शालिनी गजभारे, हवालदार मंगु जाधव, नामदेव जाधव, श्री. सावळे, श्री. साखरे, श्री. कानगुले आणि होमगार्ड श्री. पेलेवाड व श्री. सूर्यवंशी यांनी या कारवाईत परिश्रम घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Bhokar police arrested a prisoner who escaped from Parbhani. nanded news