कोरोना : शासकिय योजनेतील रुग्णालयांचे, कोरोना बाधितांच्या उपचाराकडे दुर्लक्ष

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 5 August 2020

योजनेचा फायदा खऱ्या अर्थआने रुग्णांना होत नसल्याचे दिसुन येत आहे. तर दुसरीकडे कोरोना बाधीतांवर उपचारासाठी नेक खासगी रुग्णालये पुढे येत आहेत. मात्र त्यांचा खर्च सर्वसाधारण रुग्णांना परवडत नसल्याने त्यांना शकिय रुग्णालय किंवा पंजाब भवनमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. 

नांदेड : शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा घेणारे शहरातील काही रुग्णालयांनी कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाठ फिरविली आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा खऱ्या अर्थआने रुग्णांना होत नसल्याचे दिसुन येत आहे. तर दुसरीकडे कोरोना बाधीतांवर उपचारासाठी नेक खासगी रुग्णालये पुढे येत आहेत. मात्र त्यांचा खर्च सर्वसाधारण रुग्णांना परवडत नसल्याने त्यांना शकिय रुग्णालय किंवा पंजाब भवनमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. 

कोरोना संक्रमित रुग्णांना आवश्यक उपचार मिळावेत म्हणून खासगी रुग्णालय समोर येत असले तरी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या शहर व जिल्ह्यातील अनेक रुग्णालय त्यापासून अलिप्त राहिली आहेत. सर्वात अगोदर या रुग्णालयातून संक्रमित रुग्णावर उपचार होणे आवश्यक असताना यासाठी आपले काही देणेघेणे नसावे अशा अविर्भावात ही रुग्णालय वावरत असल्याने संक्रमित रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील या सात कृषी सेवा केंद्रावर निलंबनाची टांगती तलवार

जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना

साथीची व्याप्ती वाढत असतानाही या रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठी कुठलीच व्यवस्था अद्याप आपल्या रुग्णालयात उभारणी नसल्याने शासन मात्र या रुग्णालयावर मोठा खर्च करीत आहे. कोरोना साथीचा उद्रेक लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना संक्रमित रुग्णांचा उपचार करण्याची मुभा दिली असली तर शासकीय रुग्णालय अंतर्गत केवळ खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याचा एकमेव पर्याय जनतेसमोर आहे. ज्यांना खर्च परवडत नाही त्यांनी शासकीय रुग्णालय गाठावे आणि ज्यांना खासगी उपचार पद्धती परवडतं त्यांनी आपली सोय खाजगी रुग्णालयात करून घ्यावी असा पायंडा जिल्ह्यात पडला आहे. 

दहा ते बारा रुग्णालय या योजनेअंतर्गत नोंदली गेलेली आहेत

शासकीय रुग्णालयानंतर या रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार केले जातात. अशा रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार केले जाणे क्रमप्राप्त आहे. परंतु तसे होताना दिसून येत नाही. शहरातील एका रुग्णालयात उपरोक्त व्यवस्था असली तरी नांदेडात दहा ते बारा रुग्णालय या योजनेअंतर्गत नोंदली गेलेली आहेत. परंतु या रुग्णालयांनी कोरोना रुग्णापासून स्वतःला दूरच ठेवले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एक रुग्णालय गरजू रुग्णांवर उपचार करत असले तरी खासगी रुग्णालय रुग्णावर उपचार करत नसल्याची ओरड होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: Government hospitals neglect to treat corona sufferers nanded news