esakal | नांदेड जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रकोप; ग्रामीण आरोग्य यंत्रणा झाली हतबल

बोलून बातमी शोधा

आरोग्य यंत्रणा ग्रामिण
नांदेड जिल्ह्यात वाढतोय कोरोनाचा प्रकोप; ग्रामीण आरोग्य यंत्रणा झाली हतबल
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु त्या तुलतेन आरोग्य विभागातील दुसऱ्या अधिकाऱ्यांची साथ नाही. आरोग्य अधिकारी कनिष्ठांवर भार टाकून बैठकीत व्यस्त असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. परिणामी त्यांच्या कार्यशैलीवर पदाधिकारीही नाराजी व्यक्त करत आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून हजारांवर रुग्ण समोर येत आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा ग्रामीण आरोग्यावर लक्ष ठेवून आहे, असा दावा केला जात आहे. पण मिटींग आणि बैठकांमध्येच विभाग व्यस्त असल्याचे चित्र आहे. फिल्डवरील काम समाधानकारक नाही. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना औषधोपचार वेळेवर मिळत नसल्याची ओरड आहे. आरोग्य केंद्रामध्ये टेस्टींगवरही मर्यादा आहे. लसीकरण केंद्र आणि तपासणी एकाच ठिकाणी राबविल्या जात आहे.

हेही वाचा - चांगली बातमी : नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्न बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के; मृत्यूचेही प्रमाण घटले

रुग्णांच्या घरात गृहविलगीकरणाची सोय नाही. ग्राम पंचायत प्रशासनाने विलगीकरणाची सोय उपलब्ध केली नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी ग्राम पंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई करीत नाही. कोरोना रुग्णांवर नियंत्रण नाही. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याची ओरड होत आहे. गावागावात मोठ्या प्रमाणात पसरत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहे. अधिकारी बैठकांची बहाणा करुन ऐकून घ्यायला तयार नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांच्या आहेत. बैठका, व्हीसीचे कारण करुन वरिष्ठ अधिकारी बाहेर असतात. सर्वभार अधिनस्त कनिष्ठ अधिकाऱ्यांवर आहे. त्यांच्याकडून योग्य दिशानिर्देश मिळत नसल्याने ग्रामीण भागातील जनता संभ्रमात आहे.

विलगीकरण केंद्राची व्यवस्था अपुरी

जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात विलगीकरण केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. परंतु, रुग्णसंख्या वाढत असल्याने विलगीकरण केंद्रात वाढ होणे आवश्यक आहे. याबाबत मात्र जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याची ओरड आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे