esakal | जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला; बुधवारी एक हजार ७९ पॉझिटिव्ह ः २४ बाधितांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

बुधवारी (ता.३१) तीन हजार ९१८ अहवाल प्राप्त झाले. यामधील दोन हजार ७६४ निगेटिव्ह तर एक हजार ७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४३ हजार ३५ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला; बुधवारी एक हजार ७९ पॉझिटिव्ह ः २४ बाधितांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - लॉकडाउन होऊन आठवडा झाला असून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यू संख्या कमी होईल असे वाटत होते. मात्र आठवडा भरातील पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू रुग्णांची संख्या बघितली तर, जिल्ह्यातील मृत्यूदर वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

मंगळवारी (ता.३०) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी बुधवारी (ता.३१) तीन हजार ९१८ अहवाल प्राप्त झाले. यामधील दोन हजार ७६४ निगेटिव्ह तर एक हजार ७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४३ हजार ३५ इतकी झाली आहे. बुधवारी नायगाव महिला (वय ४१), पावडेवाडी नाका नांदेड पुरुष (वय ९२), हदगाव पुरुष (वय ६२), बळिराजा मार्केट लोहा पुरुष (वय ५०), ज्ञानेश्‍वर नगर नांदेड महिला (वय ६२) बारड तालुका मुदखेड महिला (वय ५५), गाडीपुरा नांदेड महिला (वय ५४), तरोडा नाका नांदेड पुरुष (वय ६१) या आठ बाधितांवर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात तर

हेही वाचा- नांदेड : जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मरवाळीत बालविवाह रोखला

आत्तापर्यंत जिल्ह्यात ७९४ बाधितांचा मृत्यू 

जुना मोंढा नांदेड महिला (वय ९०), सावरगाव तालुका मुखेड पुरुष (वय ५०), भावसार चौक नांदेड पुरुष (वय ६५), कुंटुर तालुका नायगाव महिला (वय ६०), विकास नगर नांदेड पुरुष (वय ४२), वजिराबाद नांदेड महिला (वय ६०), आंबेकर नगर नांदेड पुरुष (वय ७५), किवळा तालुका कंधार महिला (वय ६६), साईनगर नांदेड पुरुष (वय ५५) या दहा बाधितांवर जिल्हा शासकीय रुग्णालायात, मांजरम तालुका नायगाव पुरुष (वय ९१) देगलूर कोविड सेंटर, वडज तांडा महिला (वय ६५) लोहा कोविड सेंटर पवननगर नांदेड पुरुष (वय ८०), हाडको नांदेड महिला (वय ४८), बल्लाळ तालुका भोकर पुरुष (वय ६५) व तरोडा नाका नांदेड या चार बाधितांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान वरील २४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७९४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- मुलीच्या बदनामीमुळे आईने मरणाला कवटाळले; भोकर तालुक्यातील प्रकार ः एक आरोपी ताब्यात

१७२ बाधितांची प्रकृती गंभीर 

बुधवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत - ५९९ , नांदेड ग्रामीण - ५३, लोहा -६१, कंधार -१७, मुदखेड - १०, बिलोली-३६, हिमायतनगर - ५०, माहूर - तीन, उमरी -११ , देगलूर -२८, भोकर -२१, नायगाव -३६, धर्माबाद -२०, अर्धापूर -२७, किनवट -५६, मुखेड -४१, हदगाव -दोन, हिंगोली - दोन, पुणे- एक, उस्मानाबाद - एक, लातूर - एक, आकोला- एक व आंध्रप्रदेश - एक हजार ७९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी ८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या दहा बजार ५७० बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यापैकी १७२ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. ३९८ स्वॅबची तपासणी सुरु होती. 


 
 

loading image