esakal | कोरोना अपडेट - नांदेडला दिवसभरात २४ व्यक्ती कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेडला मंगळवारी (ता. १६) दिवसभरात नवीन २४ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत. त्यामध्ये १४ पुरुष व दहा महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिघेजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

कोरोना अपडेट - नांदेडला दिवसभरात २४ व्यक्ती कोरोनाबाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात २४ व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने एकूण संख्या २८६ वर पोहचली आहे. नवीन बाधितांमध्ये १४ पुरुष तर १० महिलांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान, विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तीन कोरोना बाधित व्यक्ती बऱ्या झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचा - खरीप पेरणीला झाली सुरवात.....कुठे ते वाचा 

२४ बाधितांचे वर्गीकरण असे
आज नवीन आलेल्या २४ बाधितांपैकी नांदेड शहरातील सोमेश कॉलनी येथील तीन पुरुष (वय अनुक्रमे २२, ४१, ५३) आणि २३ वर्षाची एक महिला आहे. शिवविजय कॉलनी येथील ६७ वर्षाचा एक पुरुष व तीन महिला (वय वर्षे अनुक्रमे तीन, ३७ व ६१) आहे. श्रीकृष्णनगर येथील ६१ वर्षाचा एक पुरुष व २९ वर्षाची एक महिला आहे. फरांदेनगर येथील ५५ वर्षाचा एक पुरुष असून एमजीएम परिसरातील ३० वर्षाचा एक पुरुष आहे. विशालनगर येथील ४९ वर्षाचा एक पुरुष, बरकतपुरा येथील ३६ वर्षाचा एक पुरुष, परिमलनगर येथील ५५ वर्षाचा एक पुरुष आहे. चिखलवाडी येथील ५२ वर्षाची एक महिला, दीपनगर येथील १९ वर्षाची एक महिला, मुखेड येथील तीन पुरुष (वय वर्षे अनुक्रमे ११, ३०, ५५) आणि तीन महिला (वय वर्षे अनुक्रमे ३८, ५०, ६५) असे आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील ३८ वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या २७८ अहवालांपैकी २३० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. 

१८० जण झाले कोरोनामुक्त
आतापर्यंत २८६ बाधितांपैकी १८० बाधित व्यक्तींना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत ९३ बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील तीन बाधितांमध्ये ५२ वर्षाची एक महिला आणि ५२ व ५४ वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

९३ जणांवर उपचार सुरू
जिल्ह्यात ९३ बाधित व्यक्तींपैकी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे २३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ५२, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे १३ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून पाच बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. मंगळवारी (ता. १६) १६७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या बुधवारी (ता. १७) सायंकाळीपर्यंत प्राप्त होईल.

हेही वाचलेच पाहिजे - सोशल माध्यमावर बदनामी करतोस काय ? म्हणून... -

 • जिल्ह्याची कोरोनाविषयी संक्षीप्त माहिती 
 • सर्वेक्षण - १ लाख ४५ हजार ४६४
 • घेतलेले स्वॅब - ५ हजार ३९७
 • निगेटिव्ह स्वॅब - ४ हजार ६३०
 • आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - २४
 • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - २८६
 • स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - २२०
 • स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - ८६
 • मृत्यू संख्या - १३
 • रुग्णालयातून सुटी दिलेली संख्या - १८०
 • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - ९३
 • स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची संख्या - १६७ 

मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


 

loading image
go to top