कोरोना अपडेट - नांदेडला गुरूवारी सापडले दहा रुग्ण 

file photo
file photo

नांदेड - नांदेडला बुधवारी (ता. १७) एकही रुग्ण सापडला नसल्याने दिलासा मिळालेला असतानाच गुरूवारी (ता. १८) संध्याकाळी आलेल्या अहवालात दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्या तीनशेच्या जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी (ता. १८) प्राप्त झालेल्या एकूण २२६ अहवालापैकी १९८ निगेटिव्ह अहवाल आले तसेच दहा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २९६ झाली आहे. 

नांदेडसह इतरांचाही समावेश
आज आढळलेल्या दहा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी पाच पुरुष असून त्यात सोमेश कॉलनी येथील एक (वय ७५), परिमलनगर येथील एक (वय ४७), चैतन्यनगर येथील एक (वय ४३), भगतसिंग रोड येथील एक (वय २४) आणि औरंगाबाद येथील एक (वय ३३) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पाच महिला रुग्ण असून त्यात कामठा बुद्रुक येथील दोन महिला (वय १९ आणि २२), गजानन कॉलनी तरोडा बुद्रुक येथील एक (वय ४२), मुखेडमधील विठ्ठल मंदिर येथील एक (वय ५५) आणि कळमनुरी (जि. हिंगोली) येथील एक (वय ५५) यांचा समावेश आहे.  

१८१ जणांना सुटी
आज गुरूवारी मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमधील रुग्ण बरा झाल्यामुळे त्याला सुटी देण्यात आली आहे. आत्तापर्यंत सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. उर्वरित १०२ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यामध्ये एक महिला (वय ५२), दोन पुरुष (वय ५२ व ५४) यांचा समावेश आहे. गुरूवारी (ता. १८) ४५ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल उद्या शुक्रवारी (ता. १९) सायंकाळपर्यंत प्राप्त होतील.  

कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्यातील माहिती

  • आत्तापर्यंत एकूण संशयित - ५४४१
  • एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- ४९४८
  • क्वारंटाईन कालावधी पूर्ण - २८२५
  • अजून निरीक्षणाखाली असलेले - २९९
  • त्यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - १३०
  • घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - ४८१८
  • आज घेतलेले नमुने - ३५
  • एकुण नमुने तपासणी- ५५१४
  • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- २९६
  • त्यापैकी निगेटीव्ह - ४८४१
  • नमुने तपासणी अहवाल बाकी- ४५
  • नाकारण्यात आलेले नमुने - ९१
  • अनिर्णित अहवाल - २३२
  • कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - १८१
  • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या - १३
  • जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी १४५६८३ राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

‘आरोग्य सेतू ॲप’ मोबाईलवर करा डाऊनलोड 
कोरोनासंदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल. प्रशासनास जनतेने सहकार्य करावे.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com