esakal | कोरोनाबाधित बरे होण्याचा टक्का घसरला; बुधवारी दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह; ३६ जण कोरोनामुक्त   
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

बुधवारी ९८३ अहवाल प्राप्त झाले त्यामधील ९४६ निगेटिव्ह, तर ३३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात उपचार घेत असलेल्या ३६ कोरोनाबाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

कोरोनाबाधित बरे होण्याचा टक्का घसरला; बुधवारी दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह; ३६ जण कोरोनामुक्त   

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कधी कमी कधी जास्त असे सुरू आहे. बुधवारी (ता.२३) प्राप्त अहवालात ३६ रुग्ण कोरोनामुक्त, एका रुग्णाचा मृत्यू तर ३३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोनदिवसापूर्वी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९५ ते ९६ टके इतके होते. ते बुधवारी ९४ टक्के ९४ अंशावर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित बरे होण्याचा टक्का घसरल्याचे दिसून येते. 

मंगळवारी (ता.२२) संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी बुधवारी ९८३ अहवाल प्राप्त झाले त्यामधील ९४६ निगेटिव्ह, तर ३३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात उपचार घेत असलेल्या ३६ कोरोनाबाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता २१ हजार १८२ एवढी झाली असून त्यातील २० हजार १११ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचार सुरू असलेल्या नरहरनगर पावडेवाडी येथील महिला (वय ७५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ५६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

हेही वाचा- जास्त दराने सिलेंडरची विक्री केल्यास तक्रार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन​

१४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर 

बुधवारी नांदेड वाघाळा महापालिकेअंतर्गत १९, नांदेड ग्रामीण - एक, किनवट - एक, बिलोली - एक, देगलूर - एक, हिमायतनगर - दोन, हदगाव - सहा, मुदखेड - एक आणि नायगाव - एक असे ३३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी एकूण ३०८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील १४ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील ७४६ अंडवृद्धीच्या रुग्णांवर लवकरच शस्त्रक्रिया ​

 नांदेड कोरोना मीटर ः 

बुधवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३३ 
बुधवारी कोरोनामुक्त रुग्ण - ३६ 
बुधवारी मृत्यू - एक 
एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ११८२ 
एकूण बरे - २० हजार १११ 
एकूण मृत्यू - ५६६ 
प्रलंबित स्वॅब - ४९७ 
सध्या उपचार सुरू - ३०८ 
अतिगंभीर प्रकृती - १४