नांदेड जिल्ह्यातील ७४६ अंडवृद्धीच्या रुग्णांवर लवकरच शस्त्रक्रिया

शिवचरण वावळे
Tuesday, 22 December 2020

आरोग्य विभागाने अलीकडेच हत्तीरोग रुग्ण शोधण्याच्या घेतलेल्या राज्यव्यापी मोहिमेत अंडवृद्धी झालेल्या व हत्तीरोगाचा आजार क्युलेक्स क्विकिफॅ सिएटस या डासाच्या मादीपासून होणाऱ्या या आजारात हत्तीरोग व अंडवृद्धीचा आजार होतो.

नांदेड - जिल्हा हिवताप कार्यालयाने अंडवृद्धीच्या आजारावर शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेतली असून, पुढील तीन महिन्यापर्यंत ७४६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने निश्चित करणार आहेत. 

आरोग्य विभागाने अलीकडेच हत्तीरोग रुग्ण शोधण्याच्या घेतलेल्या राज्यव्यापी मोहिमेत अंडवृद्धी झालेल्या व हत्तीरोगाचा आजार क्युलेक्स क्विकिफॅ सिएटस या डासाच्या मादीपासून होणाऱ्या या आजारात हत्तीरोग व अंडवृद्धीचा आजार होतो. भारतातील १७ राज्ये व सहा केंद्र शासीत प्रदेशातील एकूण २५६ जिल्ह्यात हत्तीरोग व अंडवृद्धीचे रुग्ण आढळून येतात. राज्यातील मराठवाडा व विदर्भातील आठ जिल्ह्यात अंडवृद्धीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळुन येतात. या जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून विशेष परीक्षण केले जात आहे. 

हेही वाचा - नांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना अटक- सीआयडीची कारवाई, संतोष वेणीकर फरारच ​

तीन महिन्यात शस्त्रक्रिया केली जाणार 

लॉकडाउन दरम्यान अनेक आजाराच्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. मात्र हळुहळु शस्त्रक्रिया करण्यासाठीची प्रक्रिया सुरु होत आहे. मागील सहा ते आठ महिन्यादरम्यान जिल्ह्यात अंडवृद्धीची ७४६ व हत्तीरोग आजाराची दोन हजार ५५३ रुग्ण असे एकुण तीन हजार २९९ रुग्ण आढळुन आले आहेत. त्यांच्यावर टप्याटप्याने पुढील तीन महिन्यात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयाकडून प्रक्रिया सुरु झाली आहे.

कोणत्या रुग्णास कधी शस्त्रक्रियेसाठी बोलवायचे 

सोमवारी (ता. २१) या साठीची सर्व आकडेवारी एकत्रीत करुन ती जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या स्वाक्षरीनंतर ती जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाणार आहे. त्यानंतर कोणत्या रुग्णास कधी शस्त्रक्रियेसाठी बोलवायचे हे ठरविण्यात येणार आहे. 

हेही वाचा - नांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना अटक- सीआयडीची कारवाई, संतोष वेणीकर फरारच ​

९१ टक्क्यापेक्षा अधिक प्रमाण 

राज्यातील नांदेडसह, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, लातूर, अमरावती या जिल्ह्यात अंडवृद्धी व हत्तीरोग आजाराची रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण रुग्णांमध्ये हे प्रमाण ९१ टक्क्यापेक्षा अधिक आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soon surgery on 746 ovulation patients in Nanded district Nanded News