सोशल मिडीयावर कपल चॅलेंजची धूम

प्रल्हाद कांबळे
Thursday, 24 September 2020

एखादा ट्रेन्ड मनाला सुखावून जातो. सेलिब्रिटींसह प्रत्येक जण त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. सध्या फेसबुक या माध्यमावर कपल चॅलेंजची धूम सुरू असून हजारो जण आपल्या पत्नी सोबतचा फोटो शेअर करीत आहेत. 

नांदेड : सोशल मिडीयावर कधी कोणता ट्रेंड चालेल याचा भरवसा नाही. एखादा ट्रेंड ट्रोलही होतो. मात्र सध्या सोशल मीडियावर सुरू झालेला कपल चॅलेंजचा ट्रेंड चांगलाच धुमाकुळ घालत आहे. एखादा ट्रेन्ड मनाला सुखावून जातो. सेलिब्रिटींसह प्रत्येक जण त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. सध्या फेसबुक या माध्यमावर कपल चॅलेंजची धूम सुरू असून हजारो जण आपल्या पत्नी सोबतचा फोटो शेअर करीत आहेत. 

पती- पत्नीसाठी हे आनंदाचे क्षण ठरत आहे. सोशल मीडियावर कधी कोणती भन्नाट आयडिया येईल हे काही सांगता येत नसले तरी कपल चॅलेंजच्या माध्यमातून आणखी एक नवे पर्व त्या ठिकाणी सुरू झाले आहे. ते नेटकऱ्यांचा पसंतीस उतरले आहे. लॉकडाऊननंतर आता अनलॉक प्रक्रिया हाताळली जात असताना हे चॅलेंज लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ठरले आहे. यात नेटकरी आपल्या पत्नीसोबत काढलेला फोटो फेसबुकवर शेअर करुन या चॅलेंज स्पर्धेत भाग घेत आहे. हे पाहून अन्य व्यक्तीदेखील आपल्या पत्नीसोबत काढलेला फोटो शेअर करून हे चॅलेंज स्विकारत आहे.

हेही वाचा -  बँक अधिकाऱ्याची शेतकऱ्यांप्रती तळमळ : एका महिन्यात ८८० जणांना पिक कर्ज वाटप

कपल चॅलेंजमुळे पती- पत्नीमधील नाते आणखी घट्ट 

अशा प्रकारे एकमेकांना चॅलेंज देण्याची प्रथा सध्या फेसबुकवर चांगलीच रंगली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला आहे. फेसबुकवर केले तर सगळीकडे चॅलेंजचा नवविवाहित किंवा काही वर्षांपूर्वी लग्न झालेली मंडळी आपले फोटो शेअर करत असताना अनेक ज्येष्ठ मंडळी यात मागे राहिले नाही. हे आपल्या पत्नीसोबत किंवा कुटुंबासोबत काढलेला फोटो शेअर करून हे आव्हान स्विकारत आहेत. सोशल मिडियावर वेगळ्या विषयावर एकमेकांना चॅलेंज देण्याचे प्रकार घडत असले तरी हे चॅलेंज वेगळ्या प्रकारचे असून त्यामध्ये गोडवा आहे. या कपल चॅलेंजमुळे पती- पत्नीमधील नाते आणखी घट्ट होत आहे. अशी प्रतिक्रिया या स्पर्धेत भाग घेतलेल्या नेटकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple Challenge on social media nanded news