रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय? काळजी करू नका

सौम्य लक्षणांसाठी घरीच उपचार; आरोग्य विभागाकडून कोरोना किटचा पुरवठा
Corona Patients
Corona PatientsSakal

नांदेड : कोरोनाची सध्याची लाट (third wave of corona )तीव्र स्वरुपाची नसल्याने आरोग्य विभागाच्या वतीने पॉझिटिव्ह(positive patient) आलेल्यापैकी सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णास घरच्या घरी उपचार करण्यासाठी कोरोना कीटचा(corona kit) पुरवठा केला जात आहे. त्यामुळे तुमचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही किंवा तीव्र लक्षणे नसतील तर अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज राहिली नाही.

ज्या रुग्णांना कोरोना झाला आहे, असे वाटत असेल त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाशी संपर्क साधावा त्यांच्याकडे नाव नोंदणी केल्यानंतर आरोग्य विभागाकडुन त्यांच्यासाठी कोरोना आजारावर प्रभावी ठरत असलेल्या विविध प्रकारच्या गोळ्‍या, सॅनिटायझर, पाच मास्क अशी कोरोना किट तयार करण्यात आली आहे. या किटमध्ये पाच दिवस पुरेल अशा गोळ्या औषध देण्यात येत असून कोणती गोळी कधी घ्यायची या बद्दल देखील माहिती लिखित स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीस खिशातील एकही रुपया खर्च न करता कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाने जणू अभियानच सुरु केले आहे.

Corona Patients
औरंगाबाद : लसीच्या १५ हजारांवर डोसचा मिळाला साठा

मात्र, ज्या रुग्णांना पूर्वीचे इतर गंभीर आजार असतील अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतलेले बरे म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने सूचना देखील केली जात आहे. तेव्हा कोरोना आजारी रुग्णांनी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा की, घरी राहुन पाच दिवसाचा कोर्स पूर्ण करावा, हे त्यांनी ठरवायचे आहे.

Corona Patients
औरंगाबाद : लसीच्या १५ हजारांवर डोसचा मिळाला साठा

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह(nanded corona update) रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र, आता आलेली लाट पूर्वीसारखी तीव्र स्वरुपाची नाही. त्यामुळे या लाटेत मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. ज्यांना कोरोना झाला असे वाटत असेल त्यांनी चाचणी करुन घ्यावी. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना पाच दिवसाची कोरोना किट (corona kit)दिली जात आहे. ती काळजीपूर्कव घेतल्यास आजार बरा होत आहे.

- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com