esakal | जातीवाचक शिविगाळ; मरवाळीच्या चौघांविरुद्ध नायगाव ठाण्यात गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज नायगाव

जातीवाचक शिविगाळ; मरवाळीच्या चौघांविरुद्ध नायगाव ठाण्यात गुन्हा

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : दुचाकीला कट तर मारलीच पण याचा जाब विचारल्याने द्वेषाने जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना (ता. १३) रोजी रात्री घडली. सदर प्रकरणी संभाजी पुंडलिक मेटकर (वय २७) यानी दिलेल्या तक्रारीवरुन मरवाळी येथील चौघांच्या विरोधात रविवारी पहाटे अट्रासीटी कायद्यानुसार नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वादाला अवैध दारु विक्रीची किनार असल्याची चर्चा गावात होत आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, संभाजी मेटकर (वय २७) याच्या दुचाकीला (ता. १३) च्या रात्री गावातील एकाने कट मारला. त्यामुळे मेटकर याची दुचाकी ट्रक्टरला धडकली. यावरुन वाद झाला. त्यामुळे नारायण टोपाजी पिंपळे, प्रशांत पवळे, राजू शिवाजी पवळे व हनमंत शिवाजी पवळे या चौघांनी मेटकर यास जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केली. सदर प्रकरणी रात्री उशिरा संभाजी मेटकर यांनी नायगाव पोलिस ठाण्यात वरील चौघांच्या विरोधात रितसर तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात अट्राॅसीटीच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर बिलोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ व नायगावचे पोलिस निरिक्षक रामराव पडवळ यांनी मरवाळी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी डाॅ. सिध्देश्वर धुमाळ करत आहेत.

हेही वाचा - राज्य सरकारच्या चुकीमुळे विमा कंपन्यांना चार हजार २३४ कोटींचा नफा; अनील बोंडे

झालेल्या घटनेबद्दल गावातून अधिकची माहिती घेतली असता (ता. १३) रोजी फिर्यादी आणि आरोपी यांच्यात दारु पिवून शिविगाळ केल्याच्या प्रकरणावरुन किरकोळ वाद निर्माण झाला होता. तेव्हा काही जेष्ठ मंडळीनी यात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनाच अरेरावीची भाषा वापरण्यात आली होती आणि पुन्हा त्यांच्यावरच गुन्हा नोंद करण्यात आल्याने गावात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image