
नांदेड : शेतकऱ्यांकडून विशिष्ट बियाण्यांच्या वाणाची मागणी केल्यानंतर वाढत्या गर्दीचा फायदा घेत काही कंपन्या व कृषी विक्रेत्यांकडून बोगस खत, बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. बोगस बियाणे, खते विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.