

बरबडा (जि.नांदेड) : बरबडा गावाच्या जवळील शेतकऱ्यांच्या शेतातील विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. पिकांचे शेतात जाऊन पाहणी केली. बरबडा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर (Nanded District Collector Vipin Itankar) यांनी शेतकऱ्यांना आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी विमा कंपनीला फोन, ॲप, मेल व ऑफलाईन अर्जाद्वारे पिकाच्या नुकसानीची माहिती कळवली आहे. गावागावात पिकविमा कंपनीचे प्रतिनिधी आल्यानंतर झालेल्या पिकाचे सर्वे करणे हे प्रमुख काम आहे. पण विमा कंपनीचे गावोगाव नेमलेले प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून (Nanded) पैशाची मागणी करत होते. तसेच अनावश्यक सर्व कागदपत्रे मागणी करून शेतकऱ्यांची लूट करित होते. गावातील शेतकरी या कंपनीच्या प्रतिनिधीच्या मागे कामधंदे सोडून दिवसभर फिरत होते. यामुळे रोजगार बुडत आहे. आधीच शेतकऱ्यांना निसर्गाच्या (Crop Insurance) अवकृपेमुळे मोठा फटका बसलेला आहे. त्यात कंपनीच्या प्रतिनिधींनी ऊसात अर्ज फेकून दिले आहेत. हे योग्य नाही.
यावर प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलले पाहिजे. या विषयी तालुक्याचे प्रमुख या नात्याने तहसीलदार शिंदे यांच्याकडे काही पत्रकारांनी व शेतकरी वर्ग यांनी संपर्क साधला असता या विषयीची तक्रार विमा कंपनीकडे खुलासा मागणार आहे असे कळविले. इफ्को विमा कंपनी जिल्हाप्रमुख यांना कळविले याबाबत कळवले असता शेतकऱ्याला पैसे देऊ नका असे सांगा. पैसे दिल्याचा पुरावा द्या, अशी उडवा-उडवीची उत्तरे दिली. ज्या वेळी शेतकरी पिकविमा भरतो, त्यावेळी सातबारा, होल्डिंग, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक सर्व कंपनीकडे दिले जाते. नुकसान झाल्यानंतर ऑनलाईन व ऑफलाईन तक्रार सुद्धा शेतकऱ्याने कंपनीला दिले आहे. सर्व माहिती कंपनीकडे असताना मुद्दाम परत कागदपत्रे मागणे व आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारून शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या केलेली ही लूट आहे आणि या संबंधित जिल्हा प्रशासन व कृषी विभाग काय झोपा काढत आहे काय? तात्काळ याची दखल घेऊन विमा कंपनीला सांगावे. ही नौटंकी बंद करा, सरसकट सर्वे करावा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा संभाजी शिंदे, गजानंद शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.