शेतातील नुकसानीचे दुःख अनावर,तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

तरूण शेतकऱ्याने अतिवृष्टीने शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खचून जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
Farmer Suicide
Farmer Suicideesakal
Updated on

केज (जि.बीड) : तालुक्यातील (Keij) साळेगाव येथील एका अठ्ठावीस वर्षीय तरूणाने अतिवृष्टीने शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खचून जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार (ता.१९) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव बाळासाहेब रामलिंग गीते (वय २८, रा.साळेगाव, ता.केज) असे असल्याचे सांगण्यात (Farmer Suicide) आले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पूराच्या पाण्याने शेतातील मातीसह  खरिपाची उभी पिके वाहून गेली आहेत. काढणीला आलेले पिक पाण्याखाली गेल्याने (Beed) शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Farmer Suicide
Audi Indiaकडून आजपासून 'ऑडी क्यू ५' कारची बुकिंग सुरू

त्यामुळे पेरणीसाठी केलेला खर्च निघणेही अवघड झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, अशा परिस्थितीत शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खचून गेलेल्या साळेगाव येथील बाळासाहेब गीते या तरूण शेतकऱ्याने मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लवण शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, सहा व चार वर्ष वयाच्या दोन लहान मुली असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com