esakal | नांदेडमध्ये आठ लाख शेतकऱ्यांनी भरला विमा; २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

crop insurance

नांदेडमध्ये आठ लाख शेतकऱ्यांनी भरला विमा; २३ जुलैपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ता. २३ जुलैपर्यंत वाढविली आहे. पिक विमा योजनेत ज्या शेतकर्‍यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी तत्काळ पिक विम्याची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गंत नांदेड जिल्ह्यासाठी इफको टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. या योजनेंतर्गत २०२१ - २२ मध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा प्रस्ताव स्विकारणे सुरु झाले आहे. यापूर्वी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै दिली होती. तथापि राज्य शासनाने केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला अल्प मुदतीत शेतकर्‍यांना पीक विमा काढणे कठीण असल्याचे निदर्शनास आणून मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

कोविडची परिस्थिती आणि शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन ही मुदतवाढ करीत असल्याचे केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त सुनीलकुमार यांनी आदेशात म्हटले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी पिकविमा भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

हेही वाचा: हुश्श..! दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली

आठ लाख शेतकर्‍यांनी भरला विमा

खरिप पिकविमा योजनेतर्ंगत जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन, कपाशी, तूर, मुग, उडीद, ज्वारी या पिकासाठी विमा भरला, ता. एक जुलै ते ता. १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सात लाख ९५ हजार ६३८ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे.
- प्रमोद गायके, तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड.

loading image