Nanded : ‘यिन’च्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yin

‘यिन’च्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला

नांदेड : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) होणाऱ्या महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सोशल मीडियावर सर्वत्र यिन निवडणुकीची तरुणाई चर्चा करताना दिसत आहे. यिनच्या निवडणूक अधिकारीपदी सायन्स कॉलेज येथील प्रा. डॉ. किरण शिल्लेवार यांची वरिष्ठ निवडणूक अधिकारीपदी तर यिनचे माजी सांस्कृतिक मंत्री चक्रधर खानसोळे यांची कनिष्ठ निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

‘यिन’तर्फे संपूर्ण राज्यात ही निवडणूक होत आहे. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. नांदेड जिल्ह्यातील जवळपास ४५ महाविद्यालये निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत असून महाविद्यालयीन स्तरावर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारावर जोर दिला जात आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ऑनलाइन निवडणूक होणार असल्याने ही प्रक्रिया कशी असेल, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे.

सकाळ माध्यम समूहाने ‘यिन’ नावाने विद्यार्थ्यांना एक अनोखं व्यासपीठ सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. या व्यासपीठावर विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित होतील. विद्यार्थ्यांना हे अत्यंत उपयोगी व्यासपीठ आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावे.

- प्रा. डॉ. किरण शिल्लेवार, मत्स्यशास्त्र विभागप्रमुख, सायन्स कॉलेज, नांदेड

सकाळ ‘यिन’ हे युवकाला त्यांच्यामधील असलेल्या कौशल्याची ओळख करून देते. ‘यिन’मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्यातील क्षमता समजते त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला भविष्यासाठी योग्य तो मार्ग सापडतो.

- चक्रधर खानसोळे, यिन कनिष्ठ निरीक्षक

अधिकमाहितीसाठी संपर्क :

पवन वडजे, यिन अधिकारी (९९७०७७७०७३ ) यांच्याशी संपर्क साधावा.

loading image
go to top