
नांदेड : जिल्ह्यात महावितरणचा निष्काळजीपणा आणि ढिसाळ कारभारामुळे एप्रिल ते जून या अवघ्या तीन महिन्यांत सहा नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. वीज अपघातांचे सत्र थांबता थांबत नसून, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत तब्बल २१ नागरिकांचा मृत्यू झाला, तर २४ प्राणी केवळ वीज अपघातांमुळे दगावले.