कृषी निविष्ठा विक्रेत्यांचाही तीन दिवस बंदचा निर्णय  

File Photo
File Photo

नांदेड ः जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभागासह जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोयाबीनची बोगस बियाणे दिल्याप्रकरणी संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांची गंभीर समस्या बघुन लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर बियाणे विक्रेत्या दुकानदारांवर गुन्हे दाखल न करता, बियाणे उत्पादक कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार काही कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यानच्या काळात ज्या दुकानातून सोयाबिनचे बियाणे विकत घेतले त्या दुकानदाराची गुन्हे शाखेच्या आधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असल्याने मनःस्ताप सहन करावा लागत असल्याने विक्रेत्यांनी तीन दिवस प्रतिष्ठाने बंद ठेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व कृषी विक्रेते १० ते १२ जुलै दरम्यान तीन दिवसांसाठी आपली कृषी प्रतिष्ठाने बंद ठेवणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा सीडस अॅन्डं पेस्टीसाईड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर मामडे यांनी ‘ई-सकाळ’शी बोलताना दिली.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने बंद  

खरिप २०२० हंगामात राज्यात सोयाबीन बियाणे उगवण शक्तीच्या तक्रारी आल्यानंतर विक्रेत्यांना मानसिक त्रास होत आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून याची गांभीर्याने दखल घ्यावी, म्हणून हा बंद करण्यात येत आहे. तसेच आपल्या इतरही जसे की खते, कीटकनाशके आदी प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन पाठविण्यात येणार आहे. ‘माफदा’ पुणे यांनी पुकारलेल्या या बंदला जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे. कृषी केंद्र, संचालक, होलसेल विक्रेता व तालुका अध्यक्ष यांनी तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत स्थानिक पातळीवर आवाहन करत आहेत.  

नांदेड जिल्हा सीडस असोसिएशनचे पदाधिकारी  

अध्यक्ष मधुकर मामडे, उपाध्यक्ष विजयकुमार कासट, जुगल अग्रवाल, व्यंकट रेड्डी, प्रल्हादराव बोडके, दिवाकर वैद्य, मुकेश गुप्ता, राव शिंदे, बाबुराव पावडे, सदाशिवराव पुंड, दिपक बनगिनवार, शिवाशेठ पुरमवार, धनंजय पाटिल, राजुभाऊ तोष्णिवाल, पिराजी कराळे, अनिल अग्रवाल, उमाकांत दमकोंडवार, विनोद लखोटिया, अजय भारतीया, श्रीकांत ऊमरेकर, महाविरप्रसाद अग्रवाल, राजुशेठ मालपानी, संतोष मगर, कैलाश बलदवा, शिवराज जाधव, गोविंदराव जांभळेकर, महेश चक्रवार, संदिप पळशीकर, माणिकराव राखोडे, बालाजी देबडवार, राजेश्र्वर मुतेपवार, गणेश अंचितलवार, राजेश्र्वर गंगावार, गणेश जगदंबे, विशाल लोखंडे, जयप्रकाश लखोटिया, भारत वानखेडे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com