नांदेड : मनवीवस्तीतील पक्ष्यांची घटलेली संख्या चिंताजनक

File photo
File photo

नांदेड : मानवीवस्तीत आढळणारे पक्षी चिमणी, पोपट, कावळा, बुलबुल, चिरख, दयाळ, साळुंकी, ब्राम्हणी मैना आदी पक्षी आजच्या घडीला शहरामध्ये तुरळक प्रमाणात आढळून येतात. याचे मुख्य कारण देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर झालेली कत्तल व विदेशी झाडांची होणारी लागवड आहे.

गुलमोहर, सप्तपर्णी, सिंगापूर कपोक, कॅशिया, पेल्टोफॉर्म, गिरिसिडीया, विलायती चिंच आदी विदेशी आकर्षक दिसणाऱ्या झाडांवर या पक्षांपैकी बहुतांशी पक्षी त्यावर घरटी तयार करतच नाहीत. एवढेच काय तर त्या झाडांवर उतरत सुद्धा नाहीत. हे पक्षी जर मानवीवस्तीत वास्तव्यास असली तर परिसरातील किडे किटक खाऊन फस्त करतात व परिसर स्वच्छ ठेवतात. तसेच हे पक्षी वृक्षबीजांचा दूरदूरपर्यंत प्रसार करतात. म्हणून त्याना सृष्टीचे लागवड अधिकारी असेही म्हणतात.

घरट्यांसाठी जागाच नाही
चिऊताईचा जर विचार केला तर शहरी भागात मोठ्या प्रमाणावर मानवीवस्तीचे रुपांतर कॉंक्रीटच्या जंगलात झाले आहे. त्याचप्रमाणे मानवीवस्तीत मोठी वृक्ष दिसेनासे झाले आहे. चिमणी पक्षी आपली घरटी वळचणीला, सांधी, सापटी, फटीत, मातीच्या भिंतीतील छिद्र, खाच, फोटो फ्रेमचा आडोसा आदी ठिकाणी बनवित असे. आजच्या घडीला कॉंक्रीटीकरणामुळे चिऊताईला घरटे बनविण्यासाठी योग्य जागा मिळेनासी झाली आहे.

झाडे होताहेत नष्ट
सुतळी, कापूस, काथ्या, बारीक काड्या, चिंध्या इतर पक्षांची पिसे वापरून घरटे करतात. असा आजपर्यंतचा अनुभव आहे. या घरट्यात सुमारे तीन ते पाच पिल्ले बघावयास मिळत असे. परंतु, आज हे चित्र शहरी भागात कमी प्रमाणात बघायला मिळते. चिमणी पक्षी कबर, पुत्रवती, बाभूळ, बांबूची रांज, रातराणी, नांद्रुक अशा रातधाऱ्याच्या झाडाझुडपांवर गोळा होतात. परंतु, आज ही झाडे दृष्टीस पडत नाहीत. इतर पक्ष्यांच्या तुलनेत चिमण्यांना पिण्याचे पाणी अधिक लागते. कारण मोठ्या प्रमाणावर ते धान्य खातात. 

कृत्रिम घरटे हाच एकमेव पर्याय
ब्रेडचा चुरा, पोळीचा कुचकरा, शिळा भात, धान्याची भरड, वाळवणातले पोरकिडे, झुरळ, शेगांमधील अळ्या हे मानवीवस्तीत आढळणाऱ्या पक्ष्यांचे खाद्य आहे. जंगलाप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील चिमणीसह अन्य पक्ष्यांची गणना व्हावी. यामुळे निश्चितच या पक्ष्यांच्या संख्येवर होणाऱ्या परिणामाचे मुख्य कारण समोर येईल. चिमणीला अंडी खालण्यासाठी कृत्रिम तथा ईको फ्रेंडली घरटे हा एकमेव पर्याय सध्यातरी उरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com