अवकाळीमुळे कमाल तापमानात घट

temperchure.jpg
temperchure.jpg

नांदेड : जिल्ह्यात मागील आठ दिवसापासुन अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४४ अंश सेल्सिअसवर पोचलेले तापमान मागील चार दिवसापासुन ४१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याची माहिती नांदेड येथील भारतीय हवामान खात्याच्या अंशकालीन हवामान नोंदणी केंद्राचे हवामान निरिक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली. 

तापमान वाढल्याने नागरिक हैराण 
जिल्ह्यात मार्चनंतर तापमान वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. पूर्ण एप्रील महिन्याचे सरासरी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहिले. यानंतर मे महिन्यांच्या सुरवातीलाही तापमानाचा पारा चढलेला होता. ता. दोन मे रोजी कमाल तापमानात वाढ झाल्याने पारा ४४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. यानंतर सलग सहा दिवस कमाल तापमान ४३.५ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले गेले. 

पावसामुळे कमाल तापमान घटले
जिल्ह्यातील अनेक मंडळात ता. १० मे रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. दुसऱ्या दिवशी ता. ११ मे रोजीही तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर सलग तीन दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर हवेतील आद्रतेचे प्रमाणही ५१ टक्के होते. यामुळे मागील काही दिवसात तापमानाचा पारा दोन अंशाने खाली आल्याची माहिती नांदेड येथील भारतीय हवामान खात्याच्या अंशकालीन हवामान नोंदणी केंद्रातून मिळाली. 

हेही वाचलेच पाहिजे.....लग्न समारंभासाठी अशा आहेत अटी

शनिवारी अवकाळी पावसाचा अंदाज
गुरुवारी (ता. १४) दुपारी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांना काही काळ उष्णतेपासुन दिलासा मिळाला. शनिवारी (ता. १६) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या काळात वीज कोसळण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. अशावेळी शेतात काम करणाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मे महिन्यातील कमाल तापमान
जिल्ह्यात एक मे रोजी कमाल तापमान ४२.५ नोंदले गेले. तर ता. दोन मे रोजी ४४, तीन मे रोजी ४३.५, चार मे रोजी ३४.५, पाच मे रोजी ४३, सहा मे रोजी ४३.५, सात मे रोजी ४२, आठ मे रोजी ४१.५, नऊ मे रोजी ४२, दहा मे रोजी ३५.५, अकरा मे रोजी ३७, बारा मे रोजी ४१, तेरा मे रोजी ४१ तर गुरुवारी ता. १४ मे रोजी ४१.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com