Nanded: देगलूरच्या हॉटेलांमध्ये अन्नसुरक्षेचा बोजवारा; पेपरवरच खाद्यपदार्थांची विक्री; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Food Safety Violations Alleged in Deglur Hotels: देगलूरमधील अनेक हॉटेलांमध्ये खाद्यपदार्थ वर्तमानपत्रावर देणे, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचा आरोप होत असून नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
Nanded

Nanded

esakal

Updated on

देगलूर: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षेबाबत धडक कारवाईला वेग आला असून अनेक व्यावसायिकांमध्ये धडकी भरली आहे. मात्र देगलूर शहर व परिसरात या कारवाईचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक चौकांमधील हॉटेले, उपाहारगृहे, नाश्ता केंद्रे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये आजही नियमांची सर्रास पायमल्ली होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com