Nanded Cylinder Blast : शेतकामासाठी कुटुंब शेतात आणि घरात सिलेंडरचा स्फोट; सात लाखाचे नुकसान; तडखेल येथील घटना!

Cylinder Explosion : देगलूर तालुक्यातील तडखेल येथे शेतकरी राजाबाई बतलवाड यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत घरातील ७ लाखांहून अधिक किमतीचे दागिने, धान्य आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
Gas Cylinder Blast Causes ₹7 Lakh Loss to Farmer Family in Deglur

Gas Cylinder Blast Causes ₹7 Lakh Loss to Farmer Family in Deglur

sakal

Updated on

देगलूर : तालुक्यातील मौजे तडखेल येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या आगीच्या घटनेत घरातील दागिने , धान्य, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी ता. ६ रोजी सकाळी ११ वाजता घडली. पीडित कुटुंबाचे घर या आगीच्या घटनेत पूर्णतः जळून गेल्याने बत्तलवाड कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील मौजे तडखेल येथील राजाबाई हाणमंत बतलवाड या शेतकरी महिलेचे घर औराळ रस्त्यावर असून शनिवारी रोजी ते व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य शेतीकामासाठी सकाळी शेताकडे गेले होते. घरातील सिलेंडर लिकेज झाले .

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com