देगलूरच्या मातब्बरांचे सरपंचपदाचे स्वप्न भंगले

अनिल कदम
Friday, 20 November 2020


तालुक्‍यातील सर्वात मोठ्या असलेल्या हणेगाव येथील सरपंच पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले असून शहापूर येथील सरपंच पद एससी महिलेसाठी तर खानापूरचे ही सरपंचपद एसी महिलेसाठीच राखीव झाल्याने अनेकांचे सरपंच पदाचे स्वप्न आजच्या आरक्षणामध्ये भंगल्याचे चित्र पुढे आले आहे. तर सुगाव, वझर, शिळवणी, होट्टल, गवंडगाव, करडखेड, माळेगाव येथील सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने येथील निवडणुका लक्षवेधी होण्याची चिन्हे आहेत. 
 

देगलूर, (जि. नांदेड) ः तालुक्‍यातील सर्वात मोठ्या असलेल्या हणेगाव येथील सरपंच पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले असून शहापूर येथील सरपंच पद एससी महिलेसाठी तर खानापूरचे ही सरपंचपद एसी महिलेसाठीच राखीव झाल्याने अनेकांचे सरपंच पदाचे स्वप्न आजच्या आरक्षणामध्ये भंगल्याचे चित्र पुढे आले आहे. तर सुगाव, वझर, शिळवणी, होट्टल, गवंडगाव, करडखेड, माळेगाव येथील सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने येथील निवडणुका लक्षवेधी होण्याची चिन्हे आहेत. 

 

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण येथील पंचायत समिती सभागृहात प्रभारी तहसीलदार वसंत नरवाडे, अप्पर तहसीलदार महेश कुमार जमदाडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. या वेळी गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, नायब तहसीलदार निवडणूक श्री रामराव पंगे, माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंटे, जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिनिधी अनिल पाटील, मच्छिंद्र गवाले, पंकज देशमुख यांच्या सह सरपंच व लोकप्रतिनिधींची या वेळी उपस्थिती होती. तालुक्यातील अनुसूचित जाती एससी पुरुषांसाठी कावळगाव, कोकणगाव, नागाळा, येडूर, शेळगाव, भोकसखेडा, थडी सावरगाव, बागन टाकळी व मरखेल. 

हेही वाचा -  यंदाची सप्तपदीही कोरोनाच्या चक्रव्युहात, ३० नोव्हेंबरला पहिला विवाह मुहूर्त

 

अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असणारी गावे ः शहापूर, खानापूर, किनी, हावरगा, झरी, बेंबरा, चैनपुर, नंदुर, कुडली, हाळी, सोमुर. 
एसटी पुरुष यासाठी आरक्षित असणारे गावे ः सुंडगी, नरंगल, काठेवाडी. एसटी महिला सरपंच पदाची आरक्षित गावे ः टाकळी, जहागीर, लोणी. ओबीसी पुरुषासाठी आरक्षित असणारी गावे ः कबीर वाडी, कोटेकल्लुर, गोगला, गोविंद तांडा, दरेगाव, देवापुर, बल्लुर, सांगवी, करडखेड, कुशावाडी, मुजळगा, मरतोळी, केदार कुंठा. ओबीसी महिला सरपंच पदासाठी ः कावळ गड्डा, ओळख, बळेगाव, तमलूर, खोत, महापौर, करडखेड वाडी, अंतापुर, हाणेगाव, बिजवाडी, भक्तापुर, शिवनी, रामपूर. 

सर्वसाधारण महिलेसाठी ः देगाव (बु.), भुतनहिप्परगा, सांगवी, उमर मैदान, कल्लूर, चाकूर, अल्लूर, भायेगाव, शेवाळा, वन्नाळी, कारेगाव, अंबुलगा, निपाणी, सावरगाव, कामाजी वाडी, हनुमान हिप्परगा, मलकापूर, तुपशेळगाव, मंडगी, येरगी, लिंगण, केरुर, तर सर्वसाधारण पुरुषासाठी आमदापूर, करडखेड, कुरुडगी, क्षिरसमुद्र, गवंडगाव, ढोसणी, तुंबरपल्ली, मानूर, माळेगाव, रमतापूर, वझर, शिळवणी, सुगाव, होट्टल, इब्राहिमपूर, कुंमारपली, बोरगाव आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deglur's Dream Of Becoming Sarpanch Was Shattered, Nanded News