esakal | दीर्घकाळ दुर्लक्षित ज्येष्ठांच्या मागण्या अर्थसंकल्पात मान्य कराव्यात- डॉ.हंसराज वैद्य
sakal

बोलून बातमी शोधा

file photo


कष्टात आणि हलाखीत जीवन जगणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा दूर करून त्यांना दरमहा तीन हजार रूपये मानधन मंजुर करावे

दीर्घकाळ दुर्लक्षित ज्येष्ठांच्या मागण्या अर्थसंकल्पात मान्य कराव्यात- डॉ.हंसराज वैद्य

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - ज्येष्ठ नागरिक धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र शासनाने त्वरित मान्य करणेबाबत व अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्येष्ठांना प्रतिमहा तीन हजार रूपये तरतूद मान्य करणेबाबतचे निवेदन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.हंसराज वैद्य यांनी दिले आहे.


कष्टात आणि हलाखीत जीवन जगणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा दूर करून त्यांना दरमहा तीन हजार रूपये मानधन मंजुर करावे आणि ज्येष्ठांच्या इतर प्रलंबित मागण्या मान्य करणेसाठी वारंवार निवेदन, मोर्चे, सत्याग्रह, उपोषण आदी करूनही आजपर्यंत ज्येष्ठ दुर्लक्षीतच राहिलेले आहेत.

हेही वाचा संविधानामुळेच संधी : कोयत्याऐवजी आता ऊसतोड महिलेच्या हाती खासदारांच्या गावचा कारभार ? चिखलीच्या ग्रामस्थांचा मतरुपी निकाल

ज्येष्ठ नागरिकांची कुचेष्टा करण्यात आली.अपुर्‍या धोरणाची अंमलबजावणी पण करण्यात आली नाही. ज्येष्ठांची एकही न्याय मागणी मान्य न करण्यात शासनाने धन्यता मानली. तरी आता येत्या अधिवेशनात ज्येष्ठांच्या खालील प्रलंबीत मागण्या मान्य होणेची ज्येष्ठांना अपेक्षा आहे.


विशेषतः महाराष्ट्र ज्येष्ठाची वयोमर्यादा 65 वरून 60 करावी, निराधार आणि गरजू ज्येष्ठांना प्रतिमला तीन रूपये मानधन द्यावे, दारिद्रयरेषेची अट रद्द करावी आणि प्रवासात 5 टक्के जागा ज्येष्ठासहित आरक्षीत ठेवाव्यात या ज्येष्ठांच्या प्रमुख मागण्या आहेत

loading image