esakal | उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कोणते दिले आश्‍वासन...? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या आदिवासी पाड्यांवर उपविभागीय अधिकारी महेश वडदकर हे भर पावसात चिखल तुडवत जावून गांवकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी कोणते दिले आश्‍वासन...? वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर  (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील धनवेवाडी, वडाची वाडी, बुरकूलवाडी आदr आदिवासी वस्तीच्या वाड्या विकासापासून कोसोदुर आहेत. या आदिवासी पाड्यांवर उपविभागीय अधिकारी महेश वडदकर हे भर पावसात चिखल तुडवत जावून गांवकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आश्वासनामुळे गांवकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. श्री. वडदकर हे खरेच आपले आश्‍वासन पाळतात की नाही हा येणारा काळच ठरलवेल.

शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्य दिनाचा उत्सव सकाळच्या सत्रात साजरा करुन हदगावचे उपविभागीय दंडाधिकारी महेश वडदकर दुपारी वाळकेवाडी, दुधड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धनवेवाडी, वडाची वाडी, बुरकुलवाडी येथे अक्षरशः पावसात भिजत चिखल तुडवत पोहचले. तेथील गांवकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच एक महत्वपूर्ण बैठक घेऊन या ठिकाणच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी गांवकऱ्यांना सांगितले. 

हेही वाचा -  पोळा सणासाठी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या काय आहेत सुचना?...वाचा

लोकप्रतिनिधीबद्दल गावकऱ्यांत संताप 

उपजिल्हा अधिकारीच गावभेटीला आल्याने गांवकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत महेश वडदकर व तहसीलदार श्री. जाधव, मंडळ अधिकारी, तलाठी श्री. मेतलवाड यांचे गांवकऱ्यांच्या वतीने संजय माझळकर यांनी आभार मानले. सदर ठिकाणी आदिवासी बांधव हे स्वातंत्र्य पुर्व काळापासून वास्तव्यास आहेत. परंतु लोकप्रतिनिधींनी या आदिवासी वस्त्याकडे लक्षच दिले. फक्त निवडणूका डोळ्यसमोर ठेवून या भागातील लोकप्रतिनिधी येथे पोहचतात. नागरिकांना वारेमाप आश्‍वासने देतात. परंतु निवडणुका संपल्या की इकडे कुणी फिरकत नसल्याचे श्री. वडदकर यांना नागरिकांनी सांगितले. 

तहसिलदार श्री. जाधव सोमवारी घेणार बैठक

या भागातील नागरिकांना स्वातंत्र्यपुर्व काळापासून पक्का रस्तासुद्धा निट नाही. इतर समस्याच्या बाबतीत विचार न केलेलाच बरा. अस म्हणण्याची वेळ या स्थानिक गांवकऱ्यांवर आली आहे. आता थेट उपविभागीय अधिकाऱ्‍यांचा दौरा झाल्याने गांवकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या ता. १७ आॅगस्टला या बाबतीत एक महत्वपूर्ण बैठक घेण्यासंबंधी तहसिलदार श्री. जाधव यांना उपविभागीय अधिकारी यांनी आदेशित केले आहे. आता प्रशासनाच्या माध्यमातून बुरकूलवाडी, वडाची वाडी, धनवेवाडी येथील नागरिकांच्या सर्वागिण विकासासाच्या वाटा मार्गी लागणार असल्याने सध्यातरी गांवकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे