निकालाचे अकडे पाहून विकास आराखडा आखत नाही- आमदार भीमराव केराम

साजीद खान
Thursday, 29 October 2020

कास कामाचे आराखडे आखत नसल्याची अप्रत्यक्ष टीका आमदार भीमराव केराम यांनी (ता.२८) रोजी संध्याकाळी वाई बाजार ग्रामपंचायत द्वारा आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी केली.

वाई बाजार (माहूर जि. नांदेड) : विधानसभा निवडणुकीत कोणत्या गावातून किती मतदान मिळाले याची खातरजमा करायची गरज काय निवडणुकीत मतदान देणारे हे माझेच व न देणारेही माझेच, निवडणूक निकालाच्या याद्या पाहून विकास कामाचे आराखडे आखत नसल्याची अप्रत्यक्ष टीका आमदार भीमराव केराम यांनी (ता. २८) रोजी संध्याकाळी वाई बाजार ग्रामपंचायत द्वारा आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी केली.

पुढे बोलताना आमदार केराम म्हणाले की, सलग पंधरा वर्ष पराभवाची मानसिकता असली तरी धैर्य आणि आत्मविश्वास सोडला नाही.माझ्या कार्यकाळाची इनिंग सुरू होती न होती लॉक डाऊन लागले त्यामुळे विकास कामांना खीळ बसली तरी देखील मला जेवढा निधी उपलब्ध झाला तो निधी गुत्तेदराच्या घशात न घालता सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका खरेदी केल्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींना मागणी करून दहा व्हेंटिलेटर मिळविले एवढेच काय तर केंद्रीय एकलव्य आश्रम शाळेसाठी शंभर कोटींचा निधी येत्या वर्ष भरात आणणार असल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिली.

हेही वाचालोअर दूधना धरणातून रब्बीतील पिकांना मिळणार पाणी- धरणात शंभर टक्के जलसाठा, शेतकर्‍यात समाधान

गावातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी सरपंच विमल मडावी व उपसरपंच हाजी उस्मान खान यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन

वाई बाजार येथील दिवंगत शंकरराव बेहेरे पाटील यांच्या निवासस्थानी चहाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर व  ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात गावातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी सरपंच विमल मडावी व उपसरपंच हाजी उस्मान खान यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यात प्रामुख्याने हिंदू समशान भूमी ची संरक्षण भिंत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापन करणे, गोंडखेड येथे स्मशानभूमीसाठी जागा हस्तांतरित करणे आदी मागण्यांचा समावेश होता.

येथे क्लिक करा - परभणी ; अवैध वाळू वाहतूक वाद पोलिस कर्मचाऱ्यांना भोवला, एसपींनी केले बडतर्फ 

आभार उपसरपंच हाजी उस्मान खान यांनी मानले

यानंतर येथील बिरसा मुंडा चौक फलकाचे पूजन हे त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार भीमराव केराम यांच्यासमवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते धरमसिंग राठोड, अनिल तिरमनवार, भाजपा माहूर शहर अध्यक्ष गोपू महामुने, विष्णु पडलवार, स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते, नीलकंठ कातले यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नंदू कटकमवार यांनी तर आभार उपसरपंच हाजी उस्मान खान यांनी मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Development plan is not drawn by looking at the results MLA Bhimrao Keram nanded news