esakal | Video - सलग सुट्ट्यांमुळे रेणुका गडावर भक्तांची मांदियाळी, कोरोना पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पालन!
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मंदिराच्या गाभाऱ्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले होते.

Video - सलग सुट्ट्यांमुळे रेणुका गडावर भक्तांची मांदियाळी, कोरोना पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पालन!

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार (माहूर, जि.नांदेड) :  सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यामुळे तीर्थक्षेत्र माहुरच्या रेणुका गडावर भक्तांची गर्दी उसळली होती. गडावर भक्तांच्या वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याचे पहावयास मिळाले. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात होते.(ता.२६) सकाळी ११ वाजता पासून सोशल डिस्टन्सचे पालन करत दर्शन रांगेकरीता गडाच्या पायथ्यापासून  मंदिरापर्यंत रांगा लावण्यात आल्या होत्या.तर मंदिर प्रशासना कडून रेणुका मातेच्या गडावर सर्वत्र सॅनिटाझरची व्यवस्था करण्यात आली होती.

मंदिराच्या गाभाऱ्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात आले होते.साडे तीन शक्तिपीठा पैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या आई रेणुका देवी गडावर नाताळ सह जिल्ह्यात सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या असल्याने मुंबई,नाशिक,पुणे,नागपूर इत्यादी संपूर्ण राज्यासह परराज्यातील भाविकांनी आई रेणुकेच्या दर्शनासाठी पहिल्या पायरी पासून ते मंदिर गाभाऱ्या पर्यंत रांगा लावल्याने मंदिर प्रशासनाच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विशेष खबरदारी घेत भाविक भक्तासाठी सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

हेही वाचा - नांदेड : स्थायी समिती सभापतीची निवड थर्टी फर्स्टला, अनेकांची फिल्डींग

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्वच मंदिरे बंद केली होती.त्यामुळे मार्च महिन्या पासून दिवाळीच्या पाडव्या पर्यंत भाविकांना भगवान दत्तात्रेय प्रभू व श्री.रेणुका मातेच्या दर्शनास मुकावे लागले होते.त्या मुळेच की काय गत तीन दिवसापासून सुट्ट्या असल्याने भाविकांनी माहूर गडाच्या सर्वच मंदिरावर प्रचंड गर्दी केली होती. वाहन पार्किंग व्यवस्थेला जागा अपुरी असल्याने भाविक वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या याचा फटका संस्थानाचे सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती किरण पूजार यांनाही बसला. भाविकांना श्री.रेणुका मातेचे सुलभ दर्शन घडावे म्हणून रेणुका देवी संस्थानां च्या सर्वच कर्मचारी यांनी अथग परिश्रम घेतले.

संपादन- प्रल्हाद कांबळे