श्री रेणुकादेवीचा नवरात्र उत्सव भाविकांनी घरीच साजरा करावा- विश्वस्त

बालाजी कोंडे
Sunday, 11 October 2020

माहूर गडावर पुजाऱ्यांच्या उपस्थित अत्यंत साधेपणाने धार्मीक विधी, घटस्थापणा करण्यात येणार; सांस्कृतीक कार्यक्रम होणार नाही.

माहूर (जिल्हा नांदेड) : कोवीडमुळे माहूर गडावरिल श्री रेणुकादेवीचे मंदीर मार्च महिन्यापासून भाविकांना दर्शनाकरिता बंद आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवरात्र उत्सव अंत्यत साधेपणाने धार्मीक विधी व घटस्थापणा करण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शनाकरिता येऊ नये, घरीच नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी शनिवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत केले. कोवीड संसर्गामुळे देवीचा नवरात्र उत्सव होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या त्यास पुर्णविराम मिळाला.

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मुळपीठ माहूर गडावरिल श्री रेणुकादेवी संस्थान आहे. दरवर्षी श्री रेणुकादेवीचा नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो. तर उत्सव काळात लाखो भाविक देवीचे दर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी गडावर येत असतात. या वर्षी नवरात्र उत्सव ता. १७ आक्टोबर ते ता.२५ आक्टोबर या कालावधीत साजरा होणार आहे.

हेही वाचा - १४ हजारापेक्षा अधिक बाधितांची कोरोनावर मात, शनिवारी १३० जण पॉझिटिव्ह; जिल्हाभरात चौघांचा मृत्यू

शनिवारी (ता. १०) दुपारी चार वाजता माहूर तहसिल कार्यालयात श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नवरात्र उत्सवासंबधी माहीती दिली.

नवरात्र उत्सवात भाविकांनी माहूर गडावर श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता येऊ नये मंदीर बंद आहे. भाविकांनी घरीच नवरात्र उत्सव साजरा करावा. गडावर श्री रेणुका देवीची घटस्थापणा व धार्मीक विधी अत्यंत साधेपणाने करण्यात येणार आहे.

संपादन - प्र्ल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees should celebrate Shri Renuka Devi's Navratra at home Trustee nanded news