esakal | १४ हजारापेक्षा अधिक बाधितांची कोरोनावर मात, शनिवारी १३० जण पॉझिटिव्ह; जिल्हाभरात चौघांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शनिवारी (ता.दहा) एक हजार ३४२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार १६६ निगेटिव्ह, १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

१४ हजारापेक्षा अधिक बाधितांची कोरोनावर मात, शनिवारी १३० जण पॉझिटिव्ह; जिल्हाभरात चौघांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता.दहा) प्राप्त झालेल्या अहवालात २८३ कोरोना बाधितांनी आजारावर मात केली, १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच बरोबर चार रुग्णांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १४ हजार १९२ बाधितांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे. 

शुक्रवारी (ता.नऊ) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता.दहा) एक हजार ३४२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार १६६ निगेटिव्ह, १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात - ५८, नांदेड ग्रामीण-सहा, भोकर-सहा, किनवट- एक, नायगाव- पाच, कंधार- पाच, लोहा- सहा, माहूर- चार, उमरी- एक, अर्धापूर- एक, मुखेड-१९, धर्माबाद- एक, मुदखेड- चार, देगलूर- दोन, बिलोली- तीन, हिंगोली- सहा, परभणी- दोन असे १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ हजार ३०० इतकी झाली आहे. 

हेही वाचा- कोरोना ‘खाटां’ची खरी खोटी, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील ४० खाटांचे गणित जुळेना ​

४५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णापैकी शनिवारी (ता.दहा) बाबानगर नांदेड महिला (वय ३८), वाजेगाव नांदेड पुरुष (वय ४५), शिवाजी चौक माहूर महिला (वय ७५) व बहाद्दरपुरा कंधार पुरुष (वय ७०) अशा दोन पुरुष व दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४५२ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत ​

६११ अहवालांची चाचणी सुरू 

दहादिवसाच्या उपचारानंतर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - नऊ, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय- पाच, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशन मधील १८८, बिलोली- एक, उमरी- दहा, हदगाव- पाच, कंधार- दोन, देगलूर- नऊ, मुखेड- नऊ, धर्माबाद- तीन, नायगाव- चार, किनवट- पाच, लोहा- तीन, मुदखेड- पाच, अर्धापूर - चार आणि खासगी रुग्णालयातील २१ अशा २८३ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १४ हजार १९२ रुग्णांनी कोरोनावर यशस्विरित्या मात केली आहे. सध्या जिल्हाभरातील शासकीय व खासगी रुग्णालयासह कोविड केअर सेंटरमध्ये दोन हजार ५५१ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४६ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत प्रयोग शाळेत ६११ अहवालांची चाचणी सुरू होती. 

नांदेड कोरोना मीटर ः 

शनिवारी पॉझिटिव्ह- १३० 
शनिवारी कोरोनामुक्त- २८३ 
शनिवारी मृत्यू- चार 
एकूण कोरोनाबाधित रुग्ण- १७ हजार ३०० 
एकूण कोरोनामुक्त- १४ हजार १९२ 
एकूण मृत्यू- ४५२ 
उपचार सुरू- दोन हजार ५५१ 
गंभीर रुग्ण- ४६ 
अहवाल प्रतिक्षेत- ६११