esakal | बापरे...! थेट डॉक्‍टरवर हल्ला, कुठे तो वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिच्या मुलावर गुन्हा दाखल झाला. 

बापरे...! थेट डॉक्‍टरवर हल्ला, कुठे तो वाचा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिच्या मुलावर गुन्हा दाखल झाला. 

मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी आनंद मधुकर पाटील हे प्रसुती वार्डाची तपासणी करत होते. यावेळी या वार्डाच्या बाजूला एक महिला व मुलगा थांबलेले त्यांना दिसले. तुम्ही येथे कशाला थांबलात म्हणून त्यांनी त्यांना तेथून जाण्याचे सांगितले. रागाच्या भरात सदर महिलेने तुला पाहायला आलो आहे. तु आम्हाला विचारणारा कोण ? म्हणून ही महिला डॉक्टरचे शर्ट धरुन ओढू लागली. हा प्रकार पाहून तिच्या मुलाने डॉक्टरच्या श्रीमुखात भडकावली. शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच रुग्णालयात गोंधळ घालून दहशत पसरविली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला. डॉ. आनंद पाटील यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक जी. डी. चित्ते करत आहेत. 

हेही वाचा -  दोन दिवसांनंतर नांदेडला पुन्हा धक्का, एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर, संख्या गेली ९८ वर

एकाला काठीने मारहाण 

नांदेड : लॉकडाउनमध्ये नातेवाईकाला घरी आसरा देणाऱ्यालाच काठीने मारून जखमी केले. ही घटना अमराबाद (ता. अर्धापूर) येथे शनिवारी (ता. १६) सकाळी घडली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. १८) उपचारानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
कोरोना या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहेत. कितीही जवळचा नातेवाईक असला तरी त्याला कोणीच आधार देण्यास तयार नाही. परंतु नाते जपणारी मामसे आजही समाजात आहेत. असाच एक प्रकार अमराबाद (ता. अर्धापूर) येथील गंगाराम शेखोजी मोरे (वय ६८) यांनी आपला नातेवाईक असलेल्या राहूल गणपत धुताडे (वय २६) रा. खोब्रागडेनगर, नांदेड याला आपल्या घरी आधार दिला. 

अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लॉकडाउन शिथील झाल्याने व आपलाच संसार चालविण्यास कसरत करावी लागल्याने घरमालक गंगाराम मोरे यांने आधार दिलेल्या राहूल धुताडे याला आपल्या घरी जाण्याचा सल्ला दिला. यावेळी मला घरी जाण्यास का सांगत आहेस म्हणून त्याने चक्क लाकडी काठीने गंगाराम मोरे यांच्या पायावर जबर मारले यात काठीचा मार गुडघ्याला बसुन गुडघा फ्रॅक्चर झाला. उपचार केल्यानंतर गंगाराम मोरे यांनी अर्धापूर पोलिस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरुन राहूल गणपत धुताडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार श्री. लांडगे करत आहेत.