Ashok Chavan and Pratap Patil Chikhalikar
sakal
नांदेड - महापालिका निवडणुकीनिमित्त नांदेडमधील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि ‘एमआयएम’ यांच्यातील कथित संबंधांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र, खासदार चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडणुकीसाठी ठोस मुद्दाच नसल्याचा उलटवार केला.