esakal | नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव
sakal

बोलून बातमी शोधा

जेवळी (ता. लोहारा) ः किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची झालेली अवस्था.

नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्ह्यात (Nanded) सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा (Disease Attack On Soybean) प्रादुर्भाव आढळून आला होता. यावर्षी देखील या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध होण्याची गरज आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या (Crop Growth) सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी व मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. अळी देठ, फांदी व खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते व पुर्ण झाड वाळून जाते. वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे सोयाबीनवरील चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे.(disease attack on soybean crop in nanded district glp88)

हेही वाचा: Corona : मराठवाड्यात ३८२ जण कोरोनाबाधित, १२ रुग्णांचा मृत्यू

अशी घ्यावी काळजी

चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा १५ दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन ५० टक्के, ३० मिली प्रति १० लिटर अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल १८.५ एस. सी. तीन मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड. सी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

loading image
go to top