esakal | नांदेडातील बालगृहांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. पी. काळम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची उपस्थिती होती.

नांदेडातील बालगृहांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून बालगृहातील व शिशुगृहातील दाखल असलेल्या अनाथ, निराधार आणि निराश्रीत बालकांना धान्यासोबतच जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. पी. काळम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची उपस्थिती होती.
 
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण- २०१५) अधिनयमांतर्गत जिल्ह्यामध्ये कार्यरत स्वंयसेवी बालगृह व शिशुगृहामध्ये दाखल असलेल्या निराधार, निराश्रीत, परित्यक्त आणि उन्मार्गी प्रवेशीत बालकांना मदत मिळावी यासाठी लॉकडाउनच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली व बालगृहाच्या निकडीनुसार गहू, तांदूळ पीठ, दाळ, तिखट, मीठ, साबन हे जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यात आल्या. यासोबतच किर्ती गोल्डमार्फत १६५ लीटर खाद्या तेल देण्यात आले. पारले- जीचे एम. के. बोव्हरी यांच्याकडून एक हजार बिस्कीट पुड्याचे वाटप करण्यात आले. 

जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी आभार 

खाद्यपदार्थाचे वाटप स्वंयसेवी संस्थाचे अधीक्षक यांना करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. पी. काळम, जिल्हा परिविक्षा अधिकारी ए. पी. खानापूरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांच्यासह जिल्हा महिला बाल लविकास कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्वंयसेवी संस्थेच्या अधिक्षकांनी आभार मानले. 

हेही वाचा -  कुणी आणली आशा वर्करवर उपासमारीची वेळ ?...वाचा

आसना बंधाऱ्यात दोन दलघमी पाणी साठा उपलब्ध 

नांदेड : पैनगंगा प्रकल्पात नांदेड शहरासाठी सन २०२० -२१ साठी सहा दलघमी पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला होता. पैकी दोन दलघमी पाणी सोडण्यात आले असून सोमवारी (ता. ११) आसना नदीद्वारे सांगवी बंधाऱ्यात ०.९० दलघमी पाणी साठा पोहचला आहे.

नांदेड उत्तर शहरावर पाणीटंचाईचे असलेली संकट तूर्त टळले

पाणी साठा उपलब्ध झाल्याची माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी दिली आहे. टंचाई काळात नांदेड उत्तर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आसना नदी येथे बंधारा बांधण्यात आला. शिवाय नांदेड उत्तर उद्भव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. यासाठी पैनगंगा प्रकल्पात दरवर्षी पाणीसाठा आरक्षित केला जातो. या वर्षासाठी सहा दलघमी पाणीसाठा आरक्षित ठेवण्यात आला होता. सध्या पाणी टंचाई लक्षात घेता नांदेड उत्तर शहरासाठी पैनगंगा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या दोन दलघमी पानी साठ्यापैकी ०. ९० दलघमी पाणी प्राप्त झाले आहे. त्यामुळे नांदेड उत्तर शहरावर पाणीटंचाईचे असलेली संकट तूर्त टळले आहे. 

loading image
go to top