कुणी आणली आशा वर्करवर उपासमारीची वेळ ?...वाचा

फोटो
फोटो

नांदेड : तुटपुंज्या मानधनावर वरिष्ठांच्या आदेशावरुन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व तळागाळापर्यंत जावून प्रत्येकाचा सर्वे करणाऱ्या आशा वर्कर सध्या विनामोबदला काम करत असल्याने त्यांच्यावर उपासमारिची वेळ आली आहे. त्यांच्याकडे पहायला व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेला वेळ नाही. तरीसुध्दा आशा वर्कर ह्या ‘आशे’वर आपले राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणीकपणे बजावत आहेत. 

कोरोनासारखा गंभीर आजार रोखण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लाखोंचा विमा उतरविण्यात आला. अशा परिस्थितीमध्ये कोरोना संसर्गमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि रुग्ण शोधण्यासाठी मदत करणाऱ्या आशा वर्कर्सचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

महानगरपालिका ८५ अशा वर्कर्स कार्यरत

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका ८५ अशा वर्कर्स कार्यरत असून या आशा वर्कर्स नांदेड शहरातील विविध भागात जाऊन त्या - त्या भागातील बाहेरगावाहून आलेले नागरिक त्यांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती संकलित करून महानगरपालिकेला देत आहेत. किंबहुना या माहितीच्या बळावरच महानगरपालिकेचा आरोग्य विभाग हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आशा वर्कसना एक रुपयाचेही मानधन आतापर्यंत मिळाले नाही.

महानगरपालिकेने त्यांचे मानधन त्वरित करावे

कोविड- १९ च्या नियमावलीत असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि संबंधित विभागाच्या आरोग्य अधिकारी यांनाही आशा वर्कर्स यांच्या मानधन व सुरक्षेबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. या कर्मचाऱ्यांना मानधन कुठून देणार? कसे देणार ? याची तरतूद नसताना त्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे किती शहाणपणाचे आहे असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. अनेक बाबतीत पैशांची उधळण करणारी महानगरपालिका ८० ते ८५ आशा वर्कर्सवर उपासमारीची वेळ आली असतानाही कानावर हात ठेवून आहे. त्यामुळे आशा वर्कर्सची आर्थिक कोंडीची परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिकेने त्यांचे मानधन त्वरित करावे, त्यांना आरोग्य किट्स पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com