Video- रोगप्रतिकारक होमियोपॅथी औषधाचे वाटप- न्यायाधीश धोळकिया

प्रल्हाद कांबळे
Saturday, 16 May 2020

आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्याचे एकूण ४०० किट वाटप प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ, पोलिस शिपाई यांना वाटप करण्यात आल्या.

नांदेड : सध्या कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार वाढत असल्यामुळे या पासून बचाव होण्यासाठी व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने स्विकारलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक गोळ्याचे एकूण ४०० किट वाटप प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ, पोलिस शिपाई यांना वाटप करण्यात आल्या.

कोरोनासारख्या या महभयंकर आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र परिश्रम घेत आहेत. विविध पातळीवर या कोराना विषाणूवर उपाय शोधण्यास येत आहे. त्यातच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आरसेनिक अल्बम ३० या होमियोपॅथीक गोळ्यांना आयुष मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या गोळ्यांच्या सेवनामुळे माणसाच्या आरोग्याची प्रतिकार शक्ती वाढते. या गोळ्यांच्या सेवनाबद्दल होमीयोपॅथीक तज्ज्ञ तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांची सुपुत्री डॉ. उर्वी नागुरे यांनी याबद्दल नागरिकाना सविस्तर माहिती दिली. 

हेही वाचा - Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह

जिल्हा न्यायालयात होमियोपॅथी औषध वाटप

प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी आपल्या जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधिश, अधिकारी, वकिल, कर्मचारी आणि पोलिसांना या गोळ्यांचे वाटप केले. त्यांनी यापर्वी जिल्हा न्यायालयात गरजु व गरीब तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांना धान्याचे वाटप केले. एवढेच नाही तर शनिवारी (ता. १६) सकाळपासून आपल्या कक्षात बसुन न्यायालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य वाटप केले. यावेळी कर्मचऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. न्यायाधीश धोळकिया यांच्या कन्या डॉ. उर्वी नागुरे, लातूर व डॉ. सुषमा सराफ यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे न्यायाधीश राजेंद्र रोटे यांचेही सहकार्य लाभले. यावेळी न्यायाधीश एस. बी. हिवाळे यांची उपस्थिती होती. 

डॉ. उर्वी नागुरे यांचा नागरिकांना सल्ला 

डॉ. उर्वी नागुरे यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, दिन दिवस आर्सेनिक अल्बम -३० या चार गोळ्या रोज सकाळी उपाशी पोटी घ्याव्यात. त्यानंतर तिन दिवसांनी यात पंधरा दिवस अंतर ठेवावे. पंधरा दिवसानंतर पुन्हा या गोळ्यांचा डोस उपाशी पोटी घ्यावा. एक वर्षापेक्षा मोठे असलेल्या वयोगटातील नागरिकांनी ह्या गोळ्या घेतल्या तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. आयुष मंत्रालयाने प्रमाणीत केलेल्या या होमियोपॅथीक गोळ्यांना हात न लावता तोंडात टाकून त्या चोखाव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of Immune Homeopathic Medicine- Judge Dholakia nanded news