esakal | भोई प्रतिष्ठानकडून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

बोलून बातमी शोधा

file photo}

तालुक्यातील दहा कुटुंबातील पंधराच्यावर विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनच्या काळात साहित्य वाटप करण्यात आले.

भोई प्रतिष्ठानकडून शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने दत्तक घेतले आहे. या विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरु करण्यात आला असून शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येते. तालुक्यातील दहा कुटुंबातील पंधराच्यावर विद्यार्थ्यांना लाॅकडाऊनच्या काळात साहित्य वाटप करण्यात आले.

अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, कोंढा, देळूब, धामदरी, मालेगाव, नांदला येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करुन स्वावलंबी करण्यासाठी तीन वर्षापासून पुण्यातील भोई प्रतिष्ठानाच्या वतीने पुण्यजागर प्रकल्प राबविण्यात येत आहे. याकुटुंबातील महिलांना शिवनकामाचे प्रशिक्षण देवून तीन महिलांना शिलाई यंत्र देण्यात आले आहे.

लाॅकडाऊनच्या काळात शैक्षणिक प्रक्रिया बंद पडू नये व हे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहावे यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करुन आधार देण्यात आल. शैक्षणिक साहित्य घरपोच देण्यासाठी डाॅ वैभव पुरंदरे, श्री. टोकलवाड, लक्ष्मीकांत मुळे,गुणवंत विरकर, प्रा. संतोष लंगडे यांनी पुढाकार घेतला. तर यावेळी नागेश सरोळे, विजय कदम, सुरेश वळसे, सरपंच श्री. पताळे आदी उपस्थित होते.

अर्धापूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी पुण्यजागर प्रकल्प सुरु करण्यात आला असून लाॅकडाऊनच्या काळात शैक्षणिक प्रगतीला बाधा येवू नये यासाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. अशी माहिती डॉ मिलिंद भोई यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे