जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचऐवजी आता जिल्हा ग्राहक निवारण आयोग

प्रल्हाद कांबळे
Thursday, 10 September 2020

नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा ता.15 जुलै 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे.

नांदेड  : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे नावात बदल करुन जिल्हा ग्राहक निवारण आयोग असे करण्यात आले आहे. सर्व संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी प्रबंधक वि.ग.आचेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा ता.15 जुलै 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यातील कलम 28 (1) च्या अनुषंगाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे नावात बदल करण्यात आला आहे यांची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असेही कळविले आहे

केळी पिकासाठी कृषि संदेश

नांदेड : उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापूर या तालुक्यात केळी पिकांसाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम राबविण्यात येत असून केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे.

केळी पिकांवरील फुलकिडे नियंत्रणासाठी केळीच्या घडावर व्हीर्टीसिलियम लेकॅनी  (2x108cfu/gm) 3 ग्रॅम लिपाणी अधिक स्टीकर 1 मिली किंवा निंबोळी अर्क 5 टक्के स्टीकर 1 मिली फवारणी करावीफुलकिडे नियंत्रणासाठी केळ फुलबाहेर पडल्यावर त्यांनापॉलीथीनची पिशवी घालावी.

केळीच्या पानावरील ठिपके नियंत्रणासाठी ठिपके आढल्यास तो भाग काढुन व बागेच्या बाहेर नेऊन नष्ट करावाकेळीचा प्लॉट स्वच्छ व तणविरहीत  ठेवावातसेच पाण्याचा  निचरा व्यवस्थित  करावापाणी साचणार नाहीयाची काळजी घ्यावी असे आवाहन आरटीसुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी , नांदेड यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Consumer Redressal Commission instead of District Consumer Grievance Redressal Forum nanded news