esakal | नांदेड जि.प.च्या ग्रामीण रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा- 257 किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

257 किलोमीटर अंतराचे ग्रामीण रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून या रस्त्यांना जिल्हामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी मोठ्या    प्रमाणात निधी मिळणार असून जिल्ह्यातील सर्व रस्ते चकाचक होणार आहेत,

नांदेड जि.प.च्या ग्रामीण रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा- 257 किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड :  जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे असलेले नांदेड, मुदखेड, अर्धापूर, उमरी, देगलूर व मुखेड तालुक्यातील असे 257 किलोमीटर अंतराचे ग्रामीण रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून या रस्त्यांना जिल्हामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असून जिल्ह्यातील सर्व रस्ते चकाचक होणार आहेत, लॉकडाउनच्या काळात सुद्धा स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण हा प्रस्ताव मंत्रालयात नेवून मान्यता मिळवून घेतली हे विशेष .

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या ग्रामीण भागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, उमरी, देगलूर व मुखेड तालुक्यातील असे 257 किलोमीटर या अंतर्गत रस्त्यांची निधी दुरवस्था झाली होती. त्यामुळे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी रस्त्यांचा जिल्हा मार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कोरोनाच्या काळातही श्री.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता ग. व्ही.राजपूत, सुधीर नाईक, सहायक अभियंता बालाजी पाटील, जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता करपे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून मंत्रालयात सादर केला. मंत्रालयातील कक्ष अधिकारी तथा उप अभियंता संपदा मोहरीर, खासगी सचिव निशीकांत देशपांडे, विशेष कार्यकारी अधिकारी एच. जी. आरगुंडे, संदीप भाटकर यांनी या प्रस्तावाला गती दिली. शासनाने जिल्ह्यातील 257 किलोमीटर अंतरांच्या रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली. या कामांचा प्रस्ताव स्वतः बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मे महिन्यात नांदेडहून       मुंबईला नेला होता.

हेही वाचा -  नांदेड : बनावट सोयाबीन प्रकरणी गुन्हा दाखल

जिल्हा मार्गामध्ये या रस्त्यांचा समावेश   

राज्य महामार्ग 231 ते खडकूत यमशेटवाडी देगांव, जवळा पाठक, जवळा मुरहार, निवघा ते राज्य महामार्ग 361 ला जोडणारा रस्ता आता जिल्हा मार्ग क्रमांक 23 असणार आहे. यात पूर्वीची लांबी 14 किमी असून त्यामध्ये इजिमा 48 ची चार कि.मी. लांबी समाविष्ट झाल्यानंतर या मार्गाची एकूण लांबी 18 कि.मी. होणार आहे. 

26.5 किमीचा जिल्हा मार्ग होईल

भोकर- बोरगाव- धानोरा- नारवट राज्य महामार्ग 61 चितगीरी- शेंबोली- बारड- डोंगरगाव- दुधनवाडी- बोरगाव- नाद्री- देगाव हा 16 किमीचा रस्ता   जिल्हा मार्ग होईल. हा प्रमुख जिल्हा मार्ग 95 मध्ये समाविष्ट करण्यात आला असून प्रजिमा 95 ची पूर्वीची लांबी 17 किमी असूनत्यात ग्राममार्गाची 16.5 किमी समाविष्ट केल्यानंतर एकूण लांबी 33.5 किमी होईल. आसना तरोडा (बु) शेलगाव- बामणी- मेंढला (खु) राज्य महामार्ग 61 खडकी- सांगवी- अर्धापूर- शेनी- देळूब (बु.)- भोगाव ते हिंगोली सिमा रस्ता 100 क्रमांकाचा 26.5 किमीचा जिल्हा मार्ग होईल.

34.100 किमी अंतराचा आता प्रमुख जिल्हा रस्ता 103 क्रमांकाचा आहे. 

उमरी- कोंढा -अर्धापूर- पांगरी- चाभरा हा 16.100 किमीचा रस्ता 101 क्रमांकाचा 16.100 किमीची प्रमुख जिल्हा रस्ता होणार आहे. राज्य महामार्ग 61 मालेगाव- सावरगाव- कोंढा- अर्धापूर- लतीफपूर- जांभरूण- कलदगाव- येळेगाव- खैरगाव (खु.) रस्ता 102 क्रमांकाचा 30 किमीचा जिल्हा प्रमुख रस्ता होणार आहे.पाटनूर- तिरकसवाडी- नागेली- आंबेगाव- मुगटवाडी- अमराबाद- बारसगाव- जांभरूण राज्य महामार्ग 161 दाभड- बामणी- निझामपूरवाडी- कामठा- मालेगाव प्रजिमा 93 देगाव कुऱ्हाडे ते प्रजिमा 22  हा 34.100 किमी अंतराचा आता प्रमुख जिल्हा रस्ता 103 क्रमांकाचा आहे. 

येथे क्लिक कराअर्रारर : कोरोना तपासणी प्रयोगशाळेतच कोरोनाचा शिरकाव

105 क्रमांकाचा 18 किमीचा जिल्हा प्रमुख रस्ता झाला आहे. 

राज्य महामार्ग 752 आय ते चैनापूर- नागेली- बारड- अमरापूर- सरेगाव- मुगट रेल्वेस्टेशन, मुगट, आमदुरा, शिखाचीवाडी,रोही पिंपळगाव, पिंपळकौठा, पांगरगाव सिंधी हा रस्ता आता 104 क्रमांकाचा जिल्हा रस्ता झाला आहे. 
खूपसरवाडी, विष्णुपुरी, काळेश्वर, असरर्जन, फत्तेजंगपूर, राज्य महामार्ग 161 ए बळीरामपूर राज्य महामार्ग 161 तुप्पा,वडगाव, वाडीपुयड सिद्धनाथ, ब्राम्हणवाडा पाथरड रेल्वेस्टेशन हा रस्ता आता 105 क्रमांकाचा 18 किमीचा जिल्हा प्रमुख रस्ता झाला आहे. 

76 किमीचा रस्ता आता 106 क्रमांकाचा प्रमुख जिल्हा रस्ता झाला आहे

जिल्हा सरहद्द गुंडोपंत दापका, वसंतनगर तांडा, कलंबर तग्याळ डोरनाळी, रावणगाव सांगवी भादेव भोकसखेडा, बळेगाव, कावळगाव, गवंडगाव, होट्टल, देवापूर, पेडेगाव, माळेगाव, क्षीरसमुद्र येडून (खु.) ते राज्य सिमेपर्यंतचा 76 किमीचा रस्ता आता 106 क्रमांकाचा प्रमुख जिल्हा रस्ता झाला आहे. 
---