नांदेड : जिल्हा परिषदेतील विभाग होणार चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

नांदेड : जिल्हा परिषदेतील विभाग होणार चकाचक

नांदेड - सुंदर माझे कार्यालय उपक्रमांतर्गत नांदेड जिल्‍हा परिषदेत विशेष स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात येत आहे. दरम्यान जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी त‍था प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी विविध कार्यालयात जावून स्‍वच्‍छता मोहिमेची पाहणी करुन सिक्‍स बंडल पध्‍दती, कपाटात ठेवावयाच्‍या फाईल्‍स व त्‍याची वर्गवारी यासंदर्भात कर्मचा-यांशी संवाद साधून माहिती दिली. येत्‍या १५ मे पर्यंत कार्यालयीन स्वच्छता मोहिम चालणार असून, सर्व विभाग चकाचक होणार आहे. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व विभागातून स्‍वच्‍छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दरम्‍यान जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांनी सामान्‍य प्रशासन विभाग, ग्राम पंचायत विभाग, शिक्षण विभाग, स्‍वच्‍छ भारत मिशन, आरोग्‍य विभागासह विविध कार्यालयास भेटी देवून स्‍वच्‍छतेची पाहणी केली. यावेळी त्‍यांनी कर्मचा-यांशी संवाद साधून स्‍वच्‍छतेबाबत चर्चा केली.

कार्यालयात कार्यरत अधिकारी-कर्मचा-यांचा दिवसाचा एक तृतीयांश कालावधी कार्यालयात व्यतित केला जातो. कार्यालयातील वातावरण स्वच्छ, सुंदर व पोषक असल्यास त्यांची कार्यक्षमता वाढून त्याचा फायदा निश्चीतपणे प्रशासनास व सामान्य जनतेस होतो. तसेच यामुळे प्रशासन उत्तरदायी, सुलभ, स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान बनण्यास मदत होते. या बाबींचा विचार करता राज्य शासनाच्या विविध यंत्रणातील राज्यस्तर ते तालुकास्तरावरील सर्व कार्यालयांचे अंर्तबाह्य रुप बदलुन प्रशासनास गति देणे, प्रशासनात कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे. यासाठी नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व कार्यालयातून स्‍वच्‍छता मोहिम हाती घेण्‍यात आली आहे.

Web Title: Division In Nanded Zp Will Be Bright

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top