दिव्यांग कृती मोर्चाला आता दिव्यांग वृध्द निराधारांचे बळ

प्रल्हाद कांबळे
Friday, 23 October 2020

दिव्यांगाच्या अनेक मागण्यासंदर्भात आयोजित बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती मोर्चात सहभागी होणार असल्याचे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळाने निवेदनाद्वारे कळविले आहे.

नांदेड : दिव्यांगांच्या विविध मागण्यासंदर्भात बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती समितीने आयोजित मोर्चात दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ सहभागी होणार आहे. तसे निवेदन संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. त्यामुळे आता दिव्यांगाची ताकद वाढणार असून न्याय पदरात पडेपर्यंत आमची साथ कायम ठेवू असे आश्‍वासन त्यांनी दिले. 

दिव्यांगांच्या अनेक योजना अंमलात आणण्यासाठी आपल्यासहित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश कनिष्ठ अधिकारी अंमलबजावणी करित नसल्यामुळे दिव्यांगच्या अनेक योजना फक्त कागदोपञी राहात आहेत. दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व अनेक दिव्यांग संघटनेच्या वतीने न्याय मिळवा म्हणून विनंती अर्ज, भेटीगाठी, धरणे आंदोलन, मोर्चे काढून प्रशासन जागे करण्यासाठी प्रयत्न केला. तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दोन वेळा गटविकास अधिकारी व खातेप्रमुख यांची बैठक घेऊन आदेश दिले. मात्त त्यात पुढे काही झाले नाही. 

हेही वाचा -  लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई : सचखंड एक्सप्रेसमधून 29 लाखाचा गुटखा जप्त -

‘दिव्यांग मित्र ॲप’ची अंलबजावणी होणार कधी? 
 

पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिव्यांग मित्र ॲप तयार केले. या ॲपमध्ये एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून ग्रामसेवक यांना वेळापञक ता. १४ जुलै ते ३१ जुलै २०२० पर्यंत नाव नोंदणी व ता. एक आॅगस्ट ते १० आॅगष्टपर्यंत छाननी करुन तसा अहवाल द्यावा. या मयार्दा आखुण दिल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांनी ता. १६ जुलैला सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी देऊन एकही दिव्यांग वंचित राहू नये आदेश देऊन वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करत मागील चार महिन्यापासून अंमलबजावणी कनिष्ठ अधिकारी करीत नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. 

येथे क्लिक करा - हिंगोली : वीज चोरी करणाऱ्या २७५ आकडेबहाद्दरांवर कारवाई

मोर्चात सहभागी व्हावे 

अशा १९ विषयाबदल बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनता. दोन नोव्हेबर रोजी आयोजित केलेल्या दिव्यांग मोर्चास जाहिर पांठिबा व सहभागी सर्व दिव्यांग संघटनांनी आपले गटतट बाजुला ठेवुन या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, गजानन हंबर्डे, संगीताबाई बामणे, बबण पातळे, विठ्ठल बेलकर, यादव फुलारी, राजुभाऊ शेरकुरवार, प्रेमसिंग चव्हाण, बालाजी होनपारखे, राहुल सोनुले आदीने केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divyang Kriti Morcha is now the strength of Divyang Vriddha Niradhar nanded news