दिवाळी विशेष : करदोडा नात्याचा, प्रेमाचा अन धार्मिक सौदार्याचा.!

प्रल्हाद कांबळे
Saturday, 14 November 2020

. लोह्यात करदोडे तयार केले जातात, त्याची बुनडी कंधारला तर लाल धागा जालना येथे तयार होतो. ते सुटे भाग आणून त्याला लोह्यातील पटवेकर विणतात आणि त्यापासून करदोडा तयार होतो.

नांदेड : दिवाळी व भाऊबीज हा सण बहीण- भावाच्या नात्याला दृढ करणारा. यासाठी लागणार करदोडा विकणाऱ्यांनी हा आपला व्यवसाय पिढीजात ठेवत आजही आतारी म्हणून या व्यापाऱअयाकडे पाहिल्या जाते. करदोडा विक्रीकरणारे सर्वाधीक व्यापारी हे मुस्लिम धर्मीय असल्याने त्यांच्या मार्फत एक धार्मीक सौदार्याचाही अनोखे बंधन या ठिकाणी पहावयास मिळते. लोह्यात करदोडे तयार केले जातात, त्याची बुनडी कंधारला तर लाल धागा जालना येथे तयार होतो. ते सुटे भाग आणून त्याला लोह्यातील पटवेकर विणतात आणि त्यापासून करदोडा तयार होतो.

आपल्या संस्कृतीत करदोडा, मानाचा, सन्मानाचा तसेच तो नाते दृढ करणारा असतो. दिवाळीत- भाऊबीज विशेष महत्वाची. नात्याना घट्ट करणारे हे सगळं एक धागा ..बांधून ठेवतो. ते पिढ्या न पिढीच्या संबंधाला..रक्ताच्या नात्याला आणि त्याच्या पल्याड जाऊन ..ऋणानुबंधाला.. करदोडा आपण बहीण ..भावाच्या ..सग्यासोयऱ्यांच्या..मित्र परिवारांच्या आपलेपणाला बांधतो..याची निर्मिती मुस्लिम बांधवा कडून होते ..हा धागा धार्मिक सौदार्याचा होय.

हेही वाचा - नांदेड : महिला व बालविकास विभागातर्फे दत्तक सप्ताह आजपासून -

 दिवाळी, दसरा, होळी, राखी पौर्णिमा या सण उत्सवात वेगवेगळी परंपरा असते. शहरी भागात धर्माच्या नावाने अनेकदा वाद विवाद होतात..सामाजिक सलोखा ..बिघडतो..दंगली होतात..निष्पाप यात नाहक भरडले जातात..पण खेड्यात अशी परिस्थिती नसते..सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात. पिढ्या न पिढ्या जे संबंध वृद्धिंगत करत ..दिवाळी व इतर सणात किंवा प्रसिद्ध हिंदूंच्या मंदिरासमोर पूजाअर्चाची जी दुकाने थाटलेली असतात ती सर्व मुस्लिम बांधवांची असतात

महालक्ष्मीसाठी नागेलीची पाने, राख्या, होळीचे रंग, सौभाग्याचे लेणे कुंकू असे सर्वकाही आपण विकत घेतो ते मुस्लिम बांधवापासूनच येथे धर्माच्या भिंती गळून पडतात..ना जात असते ..नाही धर्म येते देवाची श्रद्धा..परंपरेचे आचरण,आणि बंधुभाव गुण्यागोविंदाने नांदतो..पण अनेकदा जात्यंधात्यावर . धर्माधतेवर  ऋणानुबंध भारी पडतात आणि तेच सामाजिक एकोप्याचे प्रतीक बनते..

शेख अझहर पटवेकर सांगत होता की, वीस रुपया पासून ते शंभर रुपया पर्यंत एक डझन याप्रमाणे करदोडा विकतो भाऊबीजपर्यंत किमान एका दुकानदाराला दोन तीन हजार रुपयांचा गल्ला येतो. चांदसाब, करीमभाई  पटवेकर, मीरासाब पटवेकर, मैनुभाई पोस्टमन, असे हे कारागीर करदोडे विकतात दिवाळी काळात अनेक दुकानदार आपले दुकान  थाटतात.
    
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali special: Kardoda relationship, love and religious friendship nanded news