दहा हजारांवर भुकेल्यांना अन्नदान करणारा अवलिया, कोण? ते वाचाच    

प्रमोद चौधरी
शनिवार, 23 मे 2020

सोशल मिडियावरून आवाहन केल्यामुळे भुकेने कासावीस झालेल्या महिलांना मिळाले दात्यांकडून जगण्यासाठीचे बळ.

नांदेड : येथील एक अवलिया सलग पाच वर्षांपासून भुकेल्यांची भूक भागवत आहे. शिवाय लॉकडाउनमध्येही या अवलियाची अविरत सेवा सुरुच होती. जवळपास १० हजार भुकेल्यांना अन्नदान वाटप करून त्याने गरजूंची भूक भागवली आहे.  

नांदेडच्या स्वामी समर्थ प्रतिष्ठाणच्या ‘हमारे सत्कर्मही हमारी पहचान है’ या तत्त्वानुसार सुनिल शर्मा हे पाच वर्षांपासून अन्नदान करत आहेत. २४ मार्चपासून पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला आणि आधीच बेरोजगार असलेले मजूर अधिकच अडचणीत सापडले. कोरोनाच्या संकटात गरजूंना मदत करणाऱ्या अनेक संस्था आणि सेवाभावी व्यक्ती पुढे आलेत. त्यामध्ये साई प्रसाद प्रतिष्ठान, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचा मोठा वाटा आहे.  

हेही वाचा - अनैतिक संबंधामुळे जन्मदात्रीच ठरली कर्दनकाळ

जिल्हा प्रशासनाने घ्यावी दखल
लॉकडाउनच्या संकटात गरजूंना आधार मिळावा या हेतूने केंद्र आणि राज्य सरकारने गरीबांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्व गरजू नागरिक सरकारी स्वस्त धान्य दुकानांमध्ये जात आहेत. परंतु, अनेकांना रेशन कार्ड नसल्यामुळे धान्यतर सोडाच अपमानाची वागणूक मिळत आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे, पण आॅनलाइन केलेले नाही अशांनाही धान्य मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे भुकबळी थांबविण्यासाठी शासनाने दिलेले आश्‍वासन खोटे ठरत असून, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

हे देखील वाचाच - या’ कारणामुळे आईने फेकले बाळाला कंन्टेनरखाली...
 
माधव अटकोरे यांच्या प्रयत्नाला आले यश
ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांच्या निदर्शनास एक धक्कादायक प्रकार समोर आला. तो असा की, मालेगाव रोडवरील एका झाडाच्या सावलीत भुकेने व्याकुळ झालेल्या दहा महिला घुटमळत होत्या. त्यांची मुले भुकेने कासावीस होवून रडत होती. महिलाही रडकुंडीला आल्या होत्या. हे दृष्य बघून श्री. अटकोरे यांनी त्यांना ५०० रुपये देवून धीर दिला. तेव्हा दुपारचे एक वाजला होता. सूर्य डोक्यावर आग ओकत होता. 

दात्यांनी दिले जगण्याचे बळ
हे वास्तव माधव अटकोरे यांनी फेसबुकवर मांडले. नुसते मांडलेच नाहीतर ‘मालेगाव रोडवरील भुकेने कासावीस झालेल्या महिलांना भूकबळीपासून वाचवा’ असे आवाहन देखील करण्यात आले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सुनील शर्मा धावून आले. त्यांनी तातडीने या महिलांसाठी अन्नाची पाकिटे आणली.

येथे क्लिक कराच कोरोना अपडेट : नांदेडमध्ये आज तीन पॉझिटिव्ह, संख्या गेली ११९ वर

त्यानंतर कंधार येथील प्रा. नितीन कुलकर्णी, शिवराज बारसे, नंदकिशोर मुरुगकर, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख कुमार कुर्तडीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपत्ती निवारण शाखेतर्फे दत्ता कुलकर्णी, धनंजय देशपांडे अशा सर्व दात्यांनी या महिलांना धान्याचे किट्स देवून जगण्यासाठी बळ दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donating Food To Tens Thousands Of Hungry People Nanded News