child.jpg
child.jpg

का? फेकले तिने बाळाला शेतात, कारण वाचून हैराण व्हाल...

फुलवळ, (ता.कंधार, जि. नांदेड) ः कंधार तालुक्यातील फुलवळ येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० च्या शेजारी असलेल्या एमआयडीसीपासून काही अंतरावरच राजानंद नारायणराव मंगनाळे यांच्या शेतात गेल्या (ता. १३) मे २०२० रोजी कोणी अज्ञात व्यक्तीने चार - पाच दिवसांचे नवजात पुरुष जातीचे बालक फेकून देऊन आरोपी पसार झाले होते. या घटनेतील आरोपीला तत्काळ बंदिस्त करून त्या निष्पाप बाळाला न्याय मिळाला. यासाठी ‘सकाळ’ने बातमीच्या माध्यमातून चांगलाच पाठपुरावा केला होता. त्याच क्रूर घटनेतील माणुसकीला काळिमा फासणारे निर्दयी आरोपी अखेर शुक्रवारी (ता. २२) कंधार पोलिसांच्या हाती लागले आणि ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला तसेच पोलिसांच्या अथक प्रयत्नाला यश आले.


पोलिस कर्मचाऱ्यांची टीम तयार 
कंधार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काही पोलिस कर्मचाऱ्यांची टीम तयार करून गुप्त माहिती घेत व मिळालेल्या माहितीवर करडी नजर ठेवून कार्यतत्परता दाखवत बिट जमादार संतोष काळे, सतीश तलवारे, बजरंग जाधव, महिला पोलिस कर्मचारी कविता कल्लुरे व राजश्री गुट्टे यांनी एक सापळा रचला आणि मिळालेल्या गुप्त माहितीनुसार (ता. २२) मे रोजी पहाटे पाच वाजल्यापासून त्या आरोपीच्या गावात साध्या कपड्यावर गस्त घालायला सुरवात केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंधार तालुक्यातील दैठणा या गावातील आरोपी असल्याचे निदर्शनास आले आणि तपासाअंती पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतले आणि थेट कंधार पोलिस ठाण्यात दाखल केले. ‘त्या’ क्रूर घटनेतील आरोपी ही त्याच निष्पाप नवजात बालकाची आईच निघाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.

माझा पान्हा दाटलेला दिसून आला
दैठणा (ता. कंधार) येथील रहिवासी एक महिला (वय ३५) वर्ष ही फुलवळ येथे घडलेल्या घटनेच्या पाच दिवस अगोदर विष्णुपुरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. प्रसूती झाल्यानंतर सुटी मिळताच एका खासगी ऑटोने ती दैठणाकडे निघाली. तिच्या सोबत तिची १४ वर्षांची मुलगी पण होती. रस्त्याने बाळ रडत असल्याने तिने त्या बाळाला दूध पाजले, परंतु फुलवळची ‘एमआयडीसी’ येताच बाळ बेशुद्ध पडले आणि माझा पान्हा दाटलेला दिसून आला. त्यामुळे बाळ मृत्युमुखी पडले असे समजून आपण त्या बाळाला ऑटो रोडवर थांबवून जवळच्या शेतात नेऊन टाकल्याचे तीने पोलिसांना सांगितले.


सत्य समाजासमोर येईल
विशेष म्हणजे तीचा पती सध्या जेलमध्ये असून याने सहा वर्षांपूर्वी शेताच्या वादात सख्या भावाचा खून केला होता. पती सजा भोगत असताना व १४ वर्षांची पहिली मुलगी असताना तीने  दैठणा येथीलच  एका ५० वर्षीय व्यक्तीसोबत जुळले. आणि यांच्या प्रेमप्रकरणातूनच ते निष्पाप नवजात बालक जन्माला आल्याचे उघडकीस आले. तसे नऊ महिने त्या क्रूर आईने त्या बाळाला पोटात वाढवले आणि जन्माला पण घातले, मात्र शेवटी तिनेच त्याचा बळी घेण्याचा डाव आखला. परंतु, म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे त्या बाळाचे नक्कीच आणखी आयुष्य शिल्लक असावे म्हणूनच तर ते आजही जिवंत आहे. पोलिसांनी शुक्रवारी महिला बरोबरच त्याला ताब्यात घेतले असून कंधार पोलिस ठाण्यात त्यांना दाखल करण्यात आले आहे. पुढील तपासात त्या दोघांचीही सखोल चौकशी करून आणखी काय आणि कोणते सत्य समाजासमोर येईल हे वेळच सांगेल.

अशा घटना अनेक ठिकाणी घडतात आणि वर्षानुवर्षे तपास हा गुलदस्त्यातच रहातो. परंतु, या घटनेप्रती ‘सकाळ’ने केलेला पाठपुरावा आणि पोलिसांनी घेतलेले परिश्रम फळाला आले व ज्यांची सर्वांनाच उत्सुकता होती त्या घटनेतील क्रूर आरोपींना अवघ्या नऊ दिवसांतच गळाला लावण्यात कंधार पोलिसांना यश आले. त्यांच्या या सतर्कतेबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असून ‘सकाळ’ने केलेल्या पाठपुराव्याचे अभिनंदनही केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com