esakal | कोरोनाबद्दल गाफील राहू नका- अर्सेनिक अल्बमचा दुसरा खुराकही वैद्य रूग्णालयात विनामुल्य- डॉ. हंसराज वैद्य
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनेक शहरात लोक मोठ्या प्रमाणात संक्रमित होताना दिसत आहेत. पुन्हा तिथे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात येत आहे. भारतात सध्याची आकडेवाडी देखील चिंताजनक आहे.

कोरोनाबद्दल गाफील राहू नका- अर्सेनिक अल्बमचा दुसरा खुराकही वैद्य रूग्णालयात विनामुल्य- डॉ. हंसराज वैद्य

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - कोरोना या जागती महामारीस कारणीभूत आजाराने जगभरात हाहाकार माजवून दिला आहे. अजूनही त्यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. शाश्वत आणि सर्वसामान्य असा औषधोपचारही नाही. सध्या करोना या आजारसंक्रमणाची तीव्रता जरी कमी झाल्यासारखे भासत असले तरी सध्या जगात बर्‍याच ठिकाणी करोनाची दुसरी लाट आल्याचे निदर्शनास येत आहे. युरोपीयन देशात करोनाने आजही उच्छाद मांडला आहे.

अनेक शहरात लोक मोठ्या प्रमाणात संक्रमित होताना दिसत आहेत. पुन्हा तिथे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात येत आहे. भारतात सध्याची आकडेवाडी देखील चिंताजनक आहे. देशात गेल्या चोवीस तासात 44 हजारहून जास्त केसेस, 520 मृत्यू तर दोन दिवसापूर्वी दिल्ली येथे एका दिवशी 100 मृत्यू ही अत्यंत गंभीर स्थिती आहे. सामुहिक प्रतिबंधात्मक शक्ती तयार होत असल्याची बातमी येते आणि वरीलप्रमाणे कोरोना परतीची, दुसरी अति गभीर लाट येण्याची शंका पण आहे.


भारतातही दिवाळीनंतर अशीच दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र सरकारने देखील जानेवारी, फेब्रुवारीमध्ये अशी शक्यता व्यक्त केली आहे. म्हणून दुसर्‍या लाटेपूर्वीच कोरोना विषाणू संक्रमणास संधी न देण्यासाठी यासंदर्भात सतर्कता तथा दक्षता बाळगून प्रतिबंधात्मक काळजी घेणे स्वतः, आप्त स्वकीय, शेजारी वगैरे या सर्वांच्या हिताचे आहे.

हेही वाचा - नांदेडकरांचा पाडवा गोड : माहूरचे रेणुकादेवी मंदीर भाविकांनी गजबजले, दर्शनाकरिता रांगा -

केंद्र, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी व समुहात जावू नये आणि जाणे आवश्यकच असल्यास अशा वेळी नेहमीच मास्कचा वापर अवश्य करावा. हाताची व नेहमी स्पर्श होणार्‍या पृष्ठभागांची स्वच्छता ठेवावी. दोन व्यक्तीमध्ये दोन गजचे शारीरिक अंतर ठेवावे. सामाजिक, धार्मिक, राजकीय मेळावे, कार्यक्रम टाळावे. भारतीय संस्कृती तथा पद्धतीनुसार दुरूनच हात जोडून नमस्कार करावा. गळाभेट, हातमिळवने टाळावे. सॅनिटायझरचा वापर करावा, हात साबणाने किंवा हँडवॉशने धुवावेत. गरोदर माता, लहान मुले, ज्येष्ठांनी जुन्या आजाराच्या रूग्णांनी घराबाहेर जावू नये. अतिशय अत्यावश्यक असल्यास घरच्या कर्त्या व्यक्तीनीच सर्व दक्षता घेवूनच बाहेर न्यावे.

ताजा संतुलित आहार, शाकाहार घेणे, फळे, फळाचा रय सेवन करावा, उपवास टाळावा. वाफ घ्यावी, गरम पाणी पिणे. माफक, नियमित, व्यायाम, योगासने, सुर्यप्रकाशाचे सेवन करावे. स्वतःच्या गच्छीवर, अंगणात मोकळ्या जागेत फिरावे. श्वसनाचा वा छातीचा हलका व्यायाम करावा. प्राणायाम करावा. शिष्टाचार आणि आरोग्याच्या हितासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. आणि धुम्रपान मात्र बिलकुल करू नये. खोकला, शिंक करताना कपड्याचा वापर करावा.
शासनाच्या सल्ल्याप्रमाणे होमिओपॅथीक औषधे प्रणालीतील अर्सेनिकम आल्बम 30 ची औषधी मात्रा, खुराक करोनाविरोधात इम्युनोबुस्टर म्हणून वैद्य रूग्णालय वजिराबाद नांदेड येथे दररोज विनामुल्य उपलब्ध आहे. सर्वांनी फायदा घ्यावा. नांदेडच्या जवळजवळ 7500 हजार कुटूंबीयांनी या औषधाचा फायदा अनुभवला आहे. रोज 4 गोळ्या उपाशीपोटी फक्त चार दिवस घ्याव्यात. कोरोनाबद्दल गाफील राहू नये असे आवाहन ज्येष्ठ डॉ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.