esakal | नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते? ते वाचाच  
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

आमचे गुंठेवारी, अकृषिक व लहान आकाराचे प्लॉट आरक्षणातून तात्काळ वगळा व आम्हाला बांधकाम परवाना महापालिकेकडून देण्यासंदर्भात पाठपुरवठा करा, अशी मागणी प्लॉटधारकांनी केली.

नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान, कोणते? ते वाचाच  

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे सकल मराठा समाज शासनाच्या विरोधात आक्रमक झाला असतानाच नांदेड उत्तरमधील आरक्षण बाधित शेतकरी व प्लॉटधारकही आक्रमक झाले आहे. त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने लोकप्रतिनिधींसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे.

नांदेड विकास आराखड्यात गेलेली शेतजमिन व प्लॉट आरक्षण आराखड्यातून वगळावा, या मागणीसाठी नांदेड उत्तरमधील शेतकरी व प्लॉटधारकांनी आमदार बालाजी कल्याणकर यांची शनिवारी (ता.२६) भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.  ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अगोदरच शेतमालाला भाव नाही. आजघडीला अनेक शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न जमलेले आहेत. पण पैशाअभावी लग्न होऊ शकलेले नाही.  तसेच प्रस्तावित आरक्षणामुळे शेतकरी आपली शेतजमीन बाजारामध्ये त्याची विक्री सुद्धा करू शकत नाहीत. अतिपावसामुळे शेतातील सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारीचे पीक नष्ट झाले आहे. 

हेही वाचा - पर्यटन दिन विशेष : नांदेड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांच्या प्रतिक्षेत

शेत जमीन व प्लाट आरक्षणातून वगळावे
त्यामुळे आज शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्याची एवढी बिकट अवस्था असताना आमच्या शेतजमिनी आरक्षणात का? कोरोना महामारीमुळे केंद्र शासन, राज्यशासन व नांदेड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना आमच्या गोरगरिबांच्या शेतजमिनीवर आरक्षण का? असे अनेक प्रश्न नांदेड उत्तरमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला. याठिकाणी नांदेड उत्तरमधील प्लॉटधारकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आमचे गुंठेवारी, अकृषिक व लहान आकाराचे प्लॉट आरक्षणातून तात्काळ वगळा व आम्हाला बांधकाम परवाना महापालिकेकडून देण्यासंदर्भात पाठपुरवठा करा, अशी मागणी प्लॉटधारकांनी केली.

हे देखील वाचाच - जागतिक पर्यटन दिन : साईंच्या कर्मभूमीप्रमाणेच जन्मभूमी येतेय नावारुपास

पालकमंत्र्यांनी घेतली होती बैठक
नगररचना विभाग, विशेष घटक यांच्याकडून वादग्रस्त नांदेड शहर प्रस्तावित विकास आराखड्याची सुनावणी नुकतीच झाली. सुरुवातीपासूनच या आराखड्याबाबतीत नांदेड उत्तरमधील शेतकरी व प्लॉटधारक यांनी प्रचंड विरोध दर्शविला होता. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी दोन सप्टेंबर रोजी बैठक घेऊन गुंठेवारी, अकृषिक, लहान आकाराचे प्लॉट प्रस्तावित विकास आराखड्यातून तात्काळ वगळावेत व एकाच शेतकऱ्याची संपूर्ण शेतजमीन विकास आराखड्यात घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त व उपसंचालक नगररचना, विशेष घटक यांना दिले.

येथे क्लिक कराच - नांदेडची हळद निघाली बांगलादेशात; शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार 
 
नकारात्मक विचार करू नये
पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर व प्लॉटधारकावर अन्याय होणार नाही. त्यामुळे कोणीही नकारात्मक विचार करू नये. कारण या प्रस्तावित आरक्षणाच्या विरोधात मी स्वतः महापालिकच्या विशेष सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. नांदेड उत्तरमधील शेतकरी व प्लॉटधारकांची परिस्थिती बिकट आहे, याची मला पूर्णपणे जाणीव असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकरी व प्लॉटधारकांना आश्‍वासन दिले.