शेतकऱ्यांवर तिहेरी संकट : राज्यातील २१ जिल्ह्यात लंपी स्किन आजाराची व्याप्ती

प्रल्हाद कांबळे
Friday, 2 October 2020

राज्यातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर, भंडारा, बुलडाणा, बीड, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांना नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

नांदेड : लंपी चर्मरोगाच्याबाबत राज्यातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर, भंडारा, बुलडाणा, बीड, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांना नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. नुकतीच याबाबत राज्याच्या कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्यावतीने अधिसुचना प्रसिद्ध केली आहे.

कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित गोजातीय प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणतेही अन्य काम पार पाडणे यास मनाई करता येईल .

उक्त नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बाधित झालेल्या गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे या गोष्टीला मनाई करता येईल.

हेही वाचामहसूल कर्मचाऱ्यांच्या संपात ५८३ अधिकारी कर्मचारी सहभागी 

लंम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने गुरे आणि म्हशी आणि गोजातीय प्रजातीमधील इतर सर्व प्राणी यांना ज्याठिकाणी ते पाळले जातात. त्या ठिकाणापासून नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरीत अन्य कोणत्याही ठिकाणी नेण्या आणण्यास मनाई करता येईल. 

कोणत्याही व्यक्तीस बाधीत गोजातीय प्रजातीचे जीवंत अथवा मृत प्राणी, कोणत्याही बाधीत झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादन उक्त नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double Crisis on Farmers: Outbreak of Lumpy Skin Disease in 21 Districts of the State nanded news