esakal | Video- काय करावं काही सुचत नाही...श्रमाची साधना पुढे न्यायची असते
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

आत्मविशासाने, स्वच्छतेचे, कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून आपण सर्वांनी एकजूट होवून कार्य केले तर संपूर्ण देशच नाहीतर समाजसुद्धा पुन्हा एकदा पूर्वपदावर यायला वेळ लागणार नाही.

Video- काय करावं काही सुचत नाही...श्रमाची साधना पुढे न्यायची असते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणूची भयानक स्थिती बघता आत्मविश्वास घेऊन जगायला प्रारंभ केला तर कुठलेही संकट दूर होतात. ‘काय करावं काही सुचत नाही’ या कवितेचे माजी शिक्षण संचालक पुणे डॉ. गोविंद नांदेड यांनी आयुष्याची कलाकृती शब्दांत मांडली आहे.    

कोरोनाच्या दहशतीखाली आपण सार्वजणच जगत आहोत. खरे म्हणजे कुठलीही भीती किंवा दहशत माणसाला कमकुवत बनवत असते. हे कमकुवतपण मनातून येत असतं. मन जेव्हा दुर्बल बनतं तेव्हा मन घाबरायला लागतं. हे घाबरलेपण आमच्या साऱ्या स्थितीला, परिस्थितीला एकंदरीतच जीवन व्यवहाराला कमकुवत करत असते; आणि तीच स्थिती आपण आज जगतो आहोत. 

हेही वाचा - Video : कडाक्याच्या उन्हातही मशागतीच्या कामांना वेग

त्यामुळे आत्मविश्वास घेवून आम्ही जगायला प्रारंभ केला तर कुठलेही संकट दुर्बल होत असतात. मात्र, आपण नेमकं तेच विसरलो आहोत. कोरोनाच्या भयानक स्थितीमुळे आपल्याला जी भिती वाटते आहे त्या भितीमुळे सारा जीवनव्यवहार विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आत्मविशासाने, स्वच्छतेचे, कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून आपण सर्वांनी एकजूट होवून कार्य केले तर संपूर्ण देशच नाहीतर समाजसुद्धा पुन्हा एकदा पूर्वपदावर यायला वेळ लागणार नाही.

डॉ. गोविंद नांदेडे यांनी लिहिलेली कविता

‘काय करावं, काहीच सुचत नाही ...!’  

‘काय करावं, काहीच सुचत नाही...
अशी विमनस्क, अकर्मण्य स्थिती आली की समजावं 
आपण खूप सारे संकल्प तर केले 
पण एकाही संकल्प पूर्तीसाठी प्राण ओतून, 
जीव लावून श्रम केले नाहीत... 
ही अवस्था म्हणजे खेड्यातील उधार देऊन 
बंद पडलेल्या दुकादारासारखी असते... 
झेप घेण्यासाठी आणि आश्चर्यकारक नवनिर्माणासाठी हीच गलितगात्र,
विमनस्क अवस्थाच योग्य वेळ असते... 
पूर्वीच्या रेषा पुसून टाकलेल्या पाटीवर नवं निर्माणाची 
एक सुंदर अजोड कलाकृती रेखाटण्याच्या 
सुर्यप्रतापाची हीच योग्य वेळ असते...
संकल्पांचा गोंधळ न करता एकेक लक्ष्य एकाग्र जिद्दीने 
भेदून महान कार्याचा शुभारंभ करायचा असतो...
‘काय करावं, काहीच सुचत नाही" 
ही वेळ कधीच येऊ नये 
यासाठी आणि यशाची उच्चतम शिखरे गाठण्यासाठी 
काहीही न बोलता ही कल्पक श्रमाची अविरत साधना सातत्याने पुढे न्यायची असते...!

loading image