Video : लेखक पृथ्वीराज तौर यांनी खुला केला बालसाहित्याचा खजिना

tour.jpg
tour.jpg


नवीन नांदेड ः तुमच्या घरातील बालवाचकांना वाचनाची आवड आहे? वाचण्यासाठी घरात पुस्तके नाहीत? देशोदेशीच्या श्रेष्ठ बालकथा तुम्हाला वाचायला आवडतात? मग तुम्हाला फार दूर जाण्याची आवश्यकता नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या फेसबुक वॉलला केवळ भेट द्या. जगभरातील श्रेष्ठ लेखकांच्या उत्तमेत्तम साहित्याची तुमची भेट होईल आणि तीही चक्क मराठीत. 

फेसबुक वॉलाच निर्देश करत असतात. डॉ. पृथ्वीराज तौर यांचे हे भाषांतरित बालसाहित्य लोकप्रिय झाले असून ठाणे येथील थिएटर, कोलाज आणि अहमदनगर येथील ऑनलाइन शब्दसमूह या नाट्य व चित्रपट अभिनेत्यांच्या समूहाने यातील अनेक कथांचे प्रकटवाचन केले आहे.

याशिवाय पुणे येथील ऋचा कुलकर्णी, गणेश भंडारी, मुंबईच्या रत्ना हेले, आश्लेषा गाडे, हरिता पुराणिक, अक्षय शिंपी, श्रेयस राजे, अंबाजोगाईचे विलास काळे, बाळासाहेब लिम्बीकाई यांनी या कथांचे अभिवाचन करून ईबुक आणि आडिओबुक निर्माण केले आहेत. समाजमाध्यमाचा सकारात्मक वापर करून विद्यापीठातील प्राध्यापकाने शालेय विद्यार्थ्यांसाठी व बालकुमार वाचकांसाठी केलेले हे प्रयत्न वाचणाऱ्या मुलांसाठी आनंददायी ठरले आहेत.

कविता केल्या मराठीत अनुवादित
झमरुदा मुहम्मद मीर या काश्मीरी अभ्यासकाच्या सहकार्याने डॉ. पृथ्वीराज तौर यांनी काश्मीरी भाषेतून थेट मराठीमध्ये महत्त्वाच्या काश्मीरी कवींच्या कवितांचे अनुवाद या काळात केले आहेत. थेट काश्मीरीतून मराठीमध्ये पहिल्यांदाच यानिमित्ताने भाषांतर होत आहे. मराठी- काश्मीरी संवादाचा सांस्कृतिक सेतू याप्रकल्पामुळे निर्माण होत आहे.

‘समकालीन काश्मीरी कविता’ या प्रकल्पांतर्गत झिया मीर यांच्या सहकार्याने दिनानाथ नादीम, रहमान राही, तरन्नुम रियाज, गुलाम रसूल संतोष, अर्जुन देव मजबूर, नसीम शफाई, गुलशन माजिद, रतनलाल शांत, निगाहत साहिबा, बशीर अतहर, हामिदी काश्मीरी अशा अनेक महत्त्वपूर्ण कवींच्या कविता मराठीत अनुवादित केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com