esakal | नांदेडसाठी बुधवार ठरला दिलासादायक 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

आठवडाभरापासून शहरासह तालुका आणि गावात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढलुन आल्याने कोरोना ग्रामिण भागात पाय पसरतो की काय असे वाटत होते. परंतु बुधवार (ता.१३) दिवस नांदेडकरांसाठी दिलासा दायक ठरला आहे. दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढुन आला नाही. 

नांदेडसाठी बुधवार ठरला दिलासादायक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नांदेड : आठवडाभरापासून शहरासह तालुका आणि गावात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढलुन आल्याने कोरोना ग्रामिण भागात पाय पसरतो की काय असे वाटत होते. परंतु बुधवार (ता.१३) दिवस नांदेडकरांसाठी दिलासा दायक ठरला आहे. दिवसभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढुन आला नाही. 


बुधवारी (ता. १३) सायंकाळ पर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या माहितीनुसार, नांदेडला आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एक लाख तीन हजार १४२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यातील दोन हजार १३१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ८७९ स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून १५७ व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आतापर्यंत घेतलेल्या स्वॅबपैकी एकुण ६३ रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा-  नांदेडमधील महिलांनी हातात घेतला एकतेचा झेंडा

सर्व कोरोना बाधीत रुग्णांची प्रकृती स्थिर-
 या ६३ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर व यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे ४३ रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु असून सर्वांती प्रकृती स्थिर असल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. औषधोपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने व इतर गंभीर अजार असल्यामुळे पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.  

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील परप्रांतीयांना लालपरीची साथ

मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करा

पॉझिटिव्ह पाच मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘आरोग्य सेतू ॲप’ डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

अशी आहे बुधवार पर्यंत जिल्ह्यातील स्थिती 

-आत्तापर्यंत एकूण संशयित - २०५०
-एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- १९३७
-क्वारंटाईन कालावधी पूर्ण - ७०७
-अजून निरीक्षणाखाली असलेले - १०७
-पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - २०२
-घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - १७३५
-एकुण नमुने तपासणी- २१३३
-एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ६३
-पैकी निगेटीव्ह - १८७९
-नमुने तपासणी अहवाल आज बाकी- १५७
-नाकारण्यात आलेले नमुने - सहा
-अनिर्णित अहवाल – २७
-कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – पाच
-जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी १०३१४२  राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.